AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

CM Uddhav Thackeray on Corona: कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

CM Uddhav Thackeray on Corona: कोरोना काळात माझ्या गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंतच्या प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलं.

CM Uddhav Thackeray on Corona: कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...
कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलंय, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 21, 2022 | 4:26 PM
Share

मुंबई: कोरोना काळात माझ्या गावपातळीपासून राज्य पातळीपर्यंतच्या प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी अतिशय उत्तम काम केलं. म्हणून आपण या संकटाचा मुकाबला करू शकलो. या काळात आपण सर्वांनी जीव धोक्यात घालून, कुटुंबापासून दूर जाऊन, रस्त्यांवर उतरून काम केलं. त्यामुळे कोरोनाच्या (corona) संकटावर आपल्याला मात करता आली. अनेक मागण्या माझ्यासमोर येत असतात. नियमात बसणाऱ्या गोष्टींना हो आणि जे नियमात बसत नाही त्याला नाही म्हणायचे असते. या दोन्ही गोष्टींची टोके जोडत राज्याच्या विकासाचा गाडा वेगवान करायचा असतो. मला माहीत आहे, कोरोना काळात मी अनेक गोष्टींना नाही म्हटलं. कारण जनतेच्या रक्षणासाठी. मग ते लॉकडाऊन (lockdown) असेल किंवा मास्कची सक्ती, असं सांगतानाच कोरोना पुन्हा डोके वर काढातांना दिसतोय. त्यामुळे काळजी घेणं आज ही आवश्यक आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(cm uddhav thackeray) यांनी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज नागरी सेवा दिनानिमित्ताने राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियानातील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख, खासदार अरविंद सावंत, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, राज्यभरातील पुरस्कार प्राप्त अधिकारी आणि कर्मचारी, शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आम्ही राजकारणी स्वप्नं दाखवणारी माणसं आहोत. पण ही स्वप्नं सत्यात आणणारी आणि जमिनीवर मजबूतपणे उभं राहून काम करणारी माणसं आपण सर्वजण आहात. दर पाच वर्षांनी आम्हाला आमच्या प्रगतीचा आढावा जनतेसमोर मांडायचा असतो. पण या प्रगतीची “गती” ठरवणारे आणि राज्याला विकासाकडे घेऊन जाणारे आपण सर्वजण आहात. सर्वसामान्य माणसाच्या डोळ्यातील दु:खाचे अश्रू पुसले जाऊन जेव्हा त्याची जागा आनंदाचे अश्रू घेतात. तेव्हा प्रशासन चांगले काम करत आहे असं माननारा मी आहे, असं राजेश टोपे म्हणाले.

राज्याचा आर्थिक विकास होतोय

मला सांगायला आनंद होतो की, अलिकडे काही निरिक्षणे जाहीर झाली आहेत. त्यात ज्या राज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे आणि ज्या राज्याच्या स्थुल राज्य उत्पन्नात चांगली वाढ होत आहे त्यामध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे. हे सगळे माझ्या चांगल्या सहकाऱ्यांमुळे शक्य झाले आहे. माझ्या कुटुंबातील सर्वजण समजूतदार आहेत. त्यामुळे मला माझे हे मोठे कुटुंब सांभाळणे शक्य होत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

दफ्तर दिरंगाई, लालफीत सारखे शब्द खोडून काढा

दफ्तर दिरंगाई, लालफीत सारखे शब्द खोडून काढायला हवेत, नागरिकांना त्यांचे हक्क  सहजतेने मिळाले पाहिजेत. राज्याला विकासाच्या मार्गावर अग्रेसर ठेवतांना सर्वजणांनी कर्तव्याप्रती समर्पित राहून काम केलं पाहिजे. ही निष्ठा राज्य, देश आणि सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी असली पाहिजे.  जे काम नियमाच्या चौकटीत राहून करणे शक्य आहे त्याला तुम्ही हो म्हणता आणि जे काम करता येत नाही त्याला “नाही” म्हणण्याचे धाडसही दाखवता, अशा शब्दात त्यांनी अधिकाऱ्यांचं कौतुक केलं.

तुम्ही विकासाचा गोवर्धन पेलणारे

लोकांना रडवणं खूप सोप असतं. हसवणं तेवढच कठीण. कोरोना काळात आपल्या सर्वांच्याच मनावर तणाव होता. आपण आपल्या स्वकीयांना गमावलं. खूप नुकसान झालं. पण या कठीण परिस्थितीचे आव्हान पेलण्याची ताकत आपण सर्वांनी दिलीत. तुम्ही कामांना “गती” देता आणि “मान” आम्हाला मिळतो. तुम्ही सर्वजण राज्याच्या विकासाचा “गोवर्धन” पेलणारे माझे सहकारी आहात, असे उद्गारही त्यांनी काढले.

संबंधित बातम्या:

MVA Ministers Hospital Bill: तुम्ही बेड बेड म्हणून तरसत होता तेव्हा मंत्री फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये उपचार घेत होते, तेही तुमच्या पैशातून, ही बघा लाखोंची बिलं

Gunratna Sadavarte : गुणरत्न सदावर्ते यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी, कोल्हापूर जिल्हा न्यायालयाचा निर्णय

Amol Mitkari : मम भार्या समर्पयामि, अमोल मिटकरींचा हाच तो व्हिडीओ ज्यावर ब्राह्मण महासंघ लालेलाल, बघा पाटील, मुंडे हसून हसून लोटपोट

नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.