CMO कडून औरंगाबाद शहराचा संभाजीनगर म्हणून उल्लेख, नामांतराचा मुद्दा आणखी पेटणार?

CMO कडून औरंगाबाद शहराचा संभाजीनगर म्हणून उल्लेख, नामांतराचा मुद्दा आणखी पेटणार?

औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरन संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे (CMO mention Aurangabad name as Sambhajinagar on twitter)

चेतन पाटील

|

Jan 06, 2021 | 7:43 PM

मुंबई : औरंगाबाद शहराच्या नामांतराचा मुद्दा प्रचंड तापला असताना मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरन संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला आहे (CMO mention Aurangabad name as Sambhajinagar on twitter). औरंगाबाद शहराचे संभाजीनगर असं नामकरण करा, अशी शिवसेनेची गेल्या कित्येक वर्षांपासूनची भूमिका आहे. औरंगाबाद महापालिकेची निवडणूक आता तोंडावर आल्याने भाजप आणि मनसेकडून शिवसेनेच्या याच भूमिकेवरुन प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. राज्यात शिवसेना सत्तेत असताना औरंगाबाद शहराचं नामकरण का झालं नाही? असा सवाल करत भाजप आणि मनसेने शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला आहे. तर काँग्रेसने संभाजीनगर नामकरणाला विरोध दर्शवला आहे. नामांतराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षांमध्येच एकमत नसल्याने विविध चर्चांना उधाण आलं होतं. या सर्व घडामोडी ताज्या असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे (CMO mention Aurangabad name as Sambhajinagar on twitter).

शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतंच केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री हरदिप पुरी यांना पाठवत औरंगाबाद विमानतळाचं छत्रपती संभाजी महाराज असं नामांतर करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे नेते अरविंद सावंत यांनी काँग्रेसला औरंगजेब तुमचा आदर्श आहे का? असा रोखठोक सवाल केला आहे. त्यामुळे शिवसेना औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या भूमिकेवर ठाम असल्याचं स्पष्ट झालं आहे.

नाव बदलण्यास काँग्रेसचा विरोध

शिवसेनेच्या या मागणीला राज्य सरकारमध्ये सहकारी पक्ष असलेल्या काँग्रेसनं विरोध केला आहे. नाव बदलणं हा काँग्रेसचा कार्यक्रम नाही, अशा गोष्टींना विरोध राहील, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच राज्यातील महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर आलेले आहे. औरंगाबाद विभागाच्या विभागीय आयुक्तांनी अहवाल दिलेला असला तरी काँग्रेसची ही भूमिका नाही. विकास करण्याला आमच्याकडून प्राधान्य राहील. महाविकास आघाडी सरकार किमान समान कार्यक्रमावर स्थापन झालं आहे. औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा विषय किमान समान कार्यक्रमात नाही. नाव बदलण्याचा विषयावर आमचा विश्वास नाही, असंही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय.

चंद्रकांत खैरेंचा इशारा

त्यावर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस नेत्यांना इशाराच दिला आहे. “काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात नामांतरावर सहज बोलले असतील. मी काँग्रेसच्या दोन-चार नेत्यांना विचारलं. तुम्ही असं कसं बोलले? संभाजी महाराजांच्या नावाला विरोध करा, आता तुमच्या घरावर दगडफेक होईल. कशाला विरोध करता? तर ते असंच विरोध करतो म्हणाले. आता असंच बोलले म्हणजे त्यांना मुस्लीम मतांची आशा आहे. पण मला अनेक मुस्लीम लोकांनी नाव संभाजीनगर करा, असं सांगितलं”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत.

संबंधित व्हिडीओ :

हेही वाचा : औरंगाबादेतील गुंठेवारीची घरे नियमित होणार, चार लाख नागरिकांना दिलासा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें