AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दुष्काळासाठी समितीची स्थापना; शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा

महाराष्ट्रातील भीषण दुष्काळ परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन केली आहे. या समितीला कॅबिनेटचे अधिकार देण्यात आले असून, तातडीने दुष्काळ निवारणाचे, पाणी व चारा व्यवस्थापनाचे तसेच पीक नुकसानीचे धोरणात्मक निर्णय घेण्याची जबाबदारी असेल.

दुष्काळासाठी समितीची स्थापना; शेतकऱ्यांसाठी देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
devendra fadnavisImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Sep 22, 2026 | 1:56 PM
Share

राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. यावर मात करण्यासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक उप समिती स्थापन केली आहे. या समितीत सत्तेतील तिन्ही पक्षातील नेते असणार आहेत. या समितीचे सचिव म्हणून राज्याचे मुख्यसचिव काम पाहणार आहेत. या समितीला कॅबिनेटचे अधिकार देण्यात आले आहेत. ही समिती दुष्काळ निवारणासाठीचे निर्णय घेणार आहे, अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधताना ही घोषणा केली आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. गिरीश महाजन, गुलाबराव पाटील, संजय राठोड, पंकजा मुंडे, दत्तात्रय भरणे, जयकुमार गोरे, प्रताप सरनाईक, मकरंद आबा पाटील, बाबासाहेब पाटील आदी मंत्री या समितीत असतील. या उपसमितीचे सचिव म्हणून राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल काम पाहतील. ही समिती दर आठवड्याला बैठक घेऊन फिल्डवरील रिपोर्टचा आढावा घेणार आहे. तसेच आवश्यक त्या सूचनाही देणार आहे. काही तक्रारी असेल तर समिती या तक्रारी दूर करेल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

धोरणात्मक निर्णय आम्ही घेऊ

मी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दर आठवड्याला कमिटीचा रिपोर्ट घेऊन वरिष्ठ लेव्हलला निर्णय घेऊ. ही कॅबिनेटची सब कमिटी आहे. त्यामुळे समितीला कॅबिनेटचे अधिकार दिले आहेत. मोठे धोरणात्मक निर्णय असेल तरच ते कॅबिनेटला येतील. दुष्काळासाठी तातडीने उपाययोजना करण्यासाठी समिती असेल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली.

राज्यात दुष्काळी परिस्थिती

फिल्डवर पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. आपल्याला शेतकऱ्यांना जी काही मदत करावी लागते, तसेच केंद्राची मदत घ्यावी लागते, त्यासाठी पंचनामे केले जात आहेत. जे काही सरकारी नियम आहेत, त्यासाठी फिल्डवरून माहिती गोळा करावी लागते. ती केली जात आहे. राज्यात बहुतांश भागात दुष्काळी परिस्थिती आहे. पिकं करपली आहेत. विशेषता सोयाबीन, काही भागात मका, कापूस यावर सर्वाधिक परिणाम झालेला दिसतो. कोकणात भातावर परिणाम झाला आहे. ज्वारीवरही परिणाम झाला आहे. वेगवेगळ्या पिकांवरचा परिणाम झाला आहे. त्याची आकडेवारी येत आहे. त्यावर उपाययोजना केल्या जाणार आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली.

चारा आणि पाण्याचं नियोजन करणार

पिण्याचे पाणी आणि जनावरांचा चारा यावर विशेष लक्ष देणार आहे. पुढचे आठ महिने आपल्याला काढायचे आहे. त्यादृष्टीने पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्यात येत आहे. पालिका, पंचायत राज यांच्याकडे पाण्याचे नियोजन केलं जाणार आहे. दुष्काळी परिस्थितीत अनेक निर्णय घ्यावे लागतील. त्यामुळे फिल्डवरील परिस्थितीनुसार सातत्याने निर्णय घ्यावे लागणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबतच्या भूमिकांवर श्वेता महालेंची टीका
राहुल बोंद्रेंच्या पक्षांतराबाबत बदलत्या भूमिकांवर श्वेता महाले कडाडल्या; म्हणाल्या...
आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर...
Maratha Andolan : आम्ही मध्यस्थी केली अन् 13 मागण्या पूर्ण झाल्या; मराठा आरक्षणावर प्रसाद लाड नेमकं काय म्हणाले?
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून...
शेतकरी संतप्त, अधिकारी गैरहजर; बाळासाहेब थोरातांनी आंदोलनात उतरून सरकारला सुनावलं
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना
मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक पुरावे शोधणार; जरांगे पाटलांची अभ्यासकांना मोठी हाक
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची...
दुष्काळाची झळ, CM फडणवीसांचा दौरा; धाराशिव-सोलापुरात पाहणीची शक्यता
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क..
लालबागच्या गर्दीत धक्कादायक प्रकार! मुलांना सिल्व्हर पेंट लावून चक्क...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85...
बाप्पाच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज; 383 कृत्रिम तळाव, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन अन्...
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकरी संकटात
डोळ्यांसमोर 4 एकर पीक करपलं; हजारोंचं नुकसान, शेतकऱ्याची व्यथा ऐकून डोळे पाणावतील
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत राऊत...
या वयातही शेतकऱ्यांच्या बांधावर...; शरद पवारांच्या दौऱ्याबाबत संजय राऊतांचं विधान
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप...
जिल्हा मध्यवर्ती बँकेत लाखोंची उलाढाल, बड्या अधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल होताच...