काँग्रेस सरकारच्या काळात 450 ला मिळणारा गॅस सिलिंडर मोदी सरकारने 1053 रुपयांना केला; काँग्रेस नेते नाना पाटोलेंची टीका

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईचा आलेख वाढतच आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भावही सामान्यांच्या हाताबाहेर गेले आहेत. तर गॅसचा भाव सातत्याने वाढवून आता तो 1050 रुपये झाला आहे. काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात 2014 साली हाच गॅस सिलिंडर 450 रुपयांना मिळत होता असे नाना पाटोले म्हणाले.

काँग्रेस सरकारच्या काळात 450 ला मिळणारा गॅस सिलिंडर मोदी सरकारने 1053 रुपयांना केला; काँग्रेस नेते नाना पाटोलेंची टीका
कॉंग्रेस नेते नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 5:13 PM

मुंबई : केंद्र सरकारने एलपीजी सिलिं(LPG gas cylinder)डरच्या किंमतीत 50 रुपयांची वाढ महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेला चा आणखी एक झटका दिला आहे. या भाववाढीने एका गॅस सिलिंडरसाठी 1053 रुपये मोजावे लागणार आहेत. एवढा महाग गॅस घेणे किती लोकांना परवडणार आहे? असा सवाल विचारत ‘न खाने दूँगा और न पकाने दूँगा’ हा मोदी सरकारचा नवा नारा बनला असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले(Congress leader Nana Patole) यांनी केली आहे.

मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईचा आलेख वाढतच आहे. महागाईवर नियंत्रण मिळवण्यात मोदी सरकारला अपयश आले आहे. जीवनावश्यक वस्तुंचे भावही सामान्यांच्या हाताबाहेर गेले आहेत. तर गॅसचा भाव सातत्याने वाढवून आता तो 1050 रुपये झाला आहे. काँग्रेस प्रणित युपीए सरकारच्या काळात 2014 साली हाच गॅस सिलिंडर 450 रुपयांना मिळत होता असे नाना पाटोले म्हणाले.

महागाईची झळ जनतेला बसू नये म्हणून डॉ. मनमोहनसिंह सरकार सबसिडी देत होते पण मोदी सरकारने ही सबसिडीही बंद केली. मोदींच्या कृपेने आता आपल्या जनतेला जगातील सर्वात महाग एलपीजी गॅस खरेदी करावा लागत आहे. नवीन गॅस कनेक्शन घेणे तर सर्वसामान्य जनतेला अशक्य झाले असल्याचेही नाना म्हणाले.

नवीन कनेक्शनसाठी आता 2200 रुपये मोजावे लागतात त्यासोबत सिक्युरिटीच्या नावाने 4400 रुपये द्यावे लागतात, रेग्युलेटरही 100 रुपयांनी महाग केला आहे. उज्ज्वला योजनेखालील 9 कोटी गॅस कनेक्शन दिल्याचे केंद्र सरकारचे आकडे पाहता या 9 कोटीमधील किती लोकांना एक हजार रुपयांचा गॅस परवडणार आहे? या योजनेतील लोकांनी पुन्हा गॅस सिलिंडर घेतलेला नाही. उज्ज्वला योजनेच्या नावाखाली गॅस कनेक्शन दिले व त्यांना मिळणारे केरोसिन बंद केले. आता एक हजार रुपयांचा गॅस परवडत नाही व केरोसिनही बंद केल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक करावा लागत असल्याचे चित्र पहायला मिळत असल्याचे नानांनी सांगीतले.

देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे, डॉलरच्या तुलनेत रुपया दररोज घसरत आहे. महागाईने जनतेला जगणे कठीण झाले आहे मात्र मोदी सरकार व मोदींच्या मित्रांचे मात्र अच्छे दिन आले आहेत. पेट्रोल डिझेलवरील करातून आधीच 26 लाख कोटी रुपयांची लूट केली असून आता देशांतर्गत तेल उत्पादनावर अतिरिक्त लाभ कर लावून सरकारला आणखी नफा मिळणार आहे. सरकार स्वतःची तिजोरी भरून जनतेला मात्र महागाईच्या खाईत लोटत आहेत घणाघाती टीकाही नाना पटोले यांनी केली.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.