सचिन वाझे कुणाच्या जवळचे? परमबीर सिंगांची चौकशी का होत नाही?; काँग्रेसचा एनआयएला सवाल

एपीआय असलेले सचिन वाझे गृहमंत्र्यांविरोधात थेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली. (sachin sawant raised questions on NIA investigation on sachin vaze case)

सचिन वाझे कुणाच्या जवळचे? परमबीर सिंगांची चौकशी का होत नाही?; काँग्रेसचा एनआयएला सवाल
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते

मुंबई: एपीआय असलेले सचिन वाझे गृहमंत्र्यांविरोधात थेट मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली. यावरून वाझे हे नेमके कुणाच्या जवळचे होते हे सिद्ध होते, असं सांगतानाच सिंग यांची चौकशी का केली जात नाही? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी एनआयएला केला आहे. (sachin sawant raised questions on NIA investigation on sachin vaze case)

सचिन सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन सचिन वाझे प्रकरणावर थेट एनआयएवर प्रश्नांची सरबत्ती केली. सचिन वाझेंनी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात थेट परमबीर सिंग यांच्याकडे तक्रार केली होती. वाझे हे एपीआय दर्जाचे अधिकारी होते. त्यांच्यावर अनेक अधिकारी होते. या सर्व अधिकाऱ्यांना बायपास करून वाझेंनी थेट सिंग यांच्याकडे तक्रार केली. त्यामुळे वाझे सिंग यांच्या किती जवळचे होते हे स्पष्ट होते. तसेच वाझेंचं कार्यालय ही सिंग यांच्या कार्यालयाच्या 100 फुटाच्या अंतरावर होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा गाडीही सिंग यांच्या कार्यालयातीलच आहे. तसेच वाझे वारंवार सिंग यांना थेट भेटायचे. त्यामुळे वाझे हे कुणाच्या संपर्कात होते आणि जवळचे होते हे स्पष्ट होत आहे, असं सांगतानाच या प्रकरणात एनआयए सिंग यांची चौकशी का करत नाही? सिंग यांची चौकशी का टाळण्यात येत आहे? सिंग यांची अटक टाळण्यात येत आहे का? वाझे सारखा अधिकारी हे सर्व प्रकरण घडवून आणूच शकत नाही. अँटालिया प्रकरण घडण्यापूर्वी वाझेंना नेमकं कोण भेटतं होतं, त्याचा तपास व्हावा, असंही ते म्हणाले.

तर राज्य सरकारने चौकशी करावी

एटीएसने 10 मार्च रोजी परमबीर सिंग यांच्या कार्यालयाकडे डिव्हीआर मागितला होता. तो एटीएसला देण्यातही आला होता. परंतु, डिव्हीआर देणं ही मोठी चूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर पुन्हा एटीएस प्रमुखांना फोन केला गेला आणि डिव्हीआर मागितला गेला. एटीएसने हा डिव्हीआर परत दिला. त्यानंतर तो गायबच आहे, अशी धक्कादायक माहिती देतानाच या डिव्हीआरमध्ये कुणाच्या हालचाली होत्या? तो अचानक कसा गायब करण्यात आला? तो एटीएसकडून कुणी मागून घेतला? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्याची एनआयए चौकशी का करत नाही?, असा सवाल करतानाच एनआयए जर चौकशी करत नसेल तर राज्य सरकारने त्याची चौकशी केली पाहिजे, अशी मागणी सावंत यांनी केली.

गिरे तो भी टांग उपर

रश्मी शुक्ला प्रकरणात भाजपची अवस्था गिरे तो भी टांग उपर अशी झाली आहे. शुक्ला या भाजपसाठीच काम करत होत्या हे स्पष्ट झालं आहे. त्यांनी पदाचा दुरुपयोग केला होता. त्याबद्दल शुक्ला यांनीच माफी मागितली आहे. मग भाजप त्यांची का बाजू घेत आहे? असा सवालही त्यांनी केला. परमबीर सिंग यांची चौकशी होऊ नये आणि त्यावरून दुसरीकडे लक्ष वळवलं जावं यासाठी शुक्ला प्रकरण काढण्यात आलं का? असा सवालही त्यांनी केला. अर्णव गोस्वामी प्रकरणात 302 कलम लावून सिंग यांना आत टाका म्हणणाऱ्या भाजपला सिंग यांचा आताच पुळका का आला? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

कुंटेंच्या अहवालाने हवा गुल

सीताराम कुंटे हे चांगले अधिकारी आहेत. असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणतात. दुसरीकडे कुंटे यांच्या अहवालावर अविश्वास दाखवतात. हा विरोधाभास असून कुंटे यांच्या अहवालाने विरोधकांच्या मुद्द्यातील हवाच निघून गेली आहे, असं ते म्हणाले. जो पेन ड्राईव्ह सरकारला देण्यात आलेला नाही, तो फडणवीसांकडे आलाच कसा? असा सवाल करून यातून महाराष्ट्राची बदनामी झाल्याचंही त्यांनी सांगितलं. (sachin sawant raised questions on NIA investigation on sachin vaze case)

 

संबंधित बातम्या:

मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडल्याने टेन्शन वाढले, त्यानंतर वाझेंनी काय केलं?; वाचा, सविस्तर

मनसुख हिरेन-सचिन वाझेंची 17 फेब्रुवारीला भेट, CSMT भागातील सीसीटीव्ही फूटेज समोर

मनसुख हिरेन यांना अर्धमेल्या अवस्थेत खाडीत फेकले; एटीएसच्या हाती मोठा पुरावा

सचिन वाझेंचे DNA सॅम्पल तपासणार, ‘त्या’ कारमध्ये सापडलेल्या साहित्याशी पडताळणी

(sachin sawant raised questions on NIA investigation on sachin vaze case)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI