सचिन वाझेंचे DNA सॅम्पल तपासणार, ‘त्या’ कारमध्ये सापडलेल्या साहित्याशी पडताळणी

दोन मर्सिडीज, इनोव्हा यांच्यासह हत्येच्या गुन्ह्यात वापरल्याचा संशय असणारी व्हॉल्वो आणि प्राडो गाडीतून फॉरेन्सिक टीमने नमुने घेतले आहेत (Sachin Vaze DNA samples)

सचिन वाझेंचे DNA सॅम्पल तपासणार, 'त्या' कारमध्ये सापडलेल्या साहित्याशी पडताळणी
सचिन वाझे
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 11:27 AM

मुंबई : अँटिलिया स्फोटक (Mukesh Ambani Bomb Scare) आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी (Mansukh Hiren Death Case) आरोपी सचिन वाझे (Sachin Vaze), विनायक शिंदे, नरेश गोर यांच्यासह आणखी काही जणांचे डीएनए तपासले जाणार आहेत. ताब्यात घेतलेल्या गाड्यांमधील साहित्यावर असलेले डीएनए आरोपींशी जुळतात का, हे पाहिले जाणार आहे. (Sachin Vaze DNA samples to be test by NIA forensic Team)

एनआयएमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत, त्या गाड्यांमधून फॉरेन्सिक टीमला पुरावे मिळाले आहेत. त्यानुसार आरोपींचे डीएनए आणि गाड्यांमध्ये सापडलेल्या साहित्यावरील डीएनए पडताळले जाणार आहेत.

फॉरेन्सिक टीमकडून डीएनए सॅम्पल गोळा

येत्या दोन दिवसात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) डीएनए रिपोर्ट मिळण्याची शक्यता आहे. दोन मर्सिडीज, इनोव्हा यांच्यासह हत्येच्या गुन्ह्यात वापरल्याचा संशय असणारी व्हॉल्वो आणि प्राडो गाडीतून फॉरेन्सिक टीमने नमुने घेतले आहेत. आरोपी सचिन वाझे, विनायक शिंदे, बुकी नरेश गोर आणि इतर काही जणांचे डीएनए घेऊन फॉरेन्सिक टीम सीएफएसला घेऊन गेल्याची माहिती आहे. NIA कडून ठोस पुरावे मिळवण्याचे काम सुरु आहे.

काय घडलं त्या रात्री?

मनसुख हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं? याचे पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांच्या चौकशीतून एटीएसच्या हाती अनेक पुरावे आले आहेत. त्याशिवाय एटीएसने सचिन वाझेंचं लोकेशन तपासलं आणि मोबाईल टॉवर आणि आयपीचं मूल्यांकनही केलं होतं. तसेच अनेक गाड्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पोस्टमार्टम रिपोर्ट काय सांगतो?

पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, असं सूत्रांनी सांगितलं. (Sachin Vaze DNA samples to be test by NIA forensic Team)

पाच रुमालाचं रहस्य काय?

हिरेन यांचा मृतदेह सापडला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यांच्या नाकात आणि तोंडात रुमाल कोंबण्यात आला होता. एकूण पाच रुमाल त्यांच्या तोंडात खूपसण्यात आले होते. हे रुमाल रोल करण्यात आले होते, असं सूत्रांनी सांगितलं.

हत्येच्या ठिकाणी वाझे उपस्थित होते

हिरेन यांची हत्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या समोरच करण्यात आली. त्यानंतर वाझे यांच्या समोरच हिरेन यांचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत फेकण्यात आला असावा अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे.

संबंधित बातम्या:

एनआयएची सचिन वाझेंवर आता UAPA कायद्यांतर्गत कारवाईची तयारी

सचिन वाझेंची वैद्यकीय तपासणी, NIA अधिकारी आणि डॉक्टर सॅम्पलसह रवाना

(Sachin Vaze DNA samples to be test by NIA forensic Team)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.