क्लोरोफार्म देऊन हिरेनची हत्या?, एटीएसच्या हाती मोठा पुरावा, वाचा, ‘त्या’ दिवशी नेमकं काय घडलं?

मनसुख हिरेन प्रकरणाचा गुंता सोडवण्यात एटीएसला मोठं यश आलं आहे. (antillia case: mansukh hiren sedated using chloroform smothered to death)

क्लोरोफार्म देऊन हिरेनची हत्या?, एटीएसच्या हाती मोठा पुरावा, वाचा, 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?
मनसुख हिरेन आणि सचिन वाझे
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 10:48 AM

मुंबई: मनसुख हिरेन प्रकरणाचा गुंता सोडवण्यात एटीएसला मोठं यश आलं आहे. हिरेन यांची हत्या नेमकी कशी झाली? त्या दिवशी नेमकं काय झालं? याची माहिती एटीएसला मिळाली आहे. आता केवळ फॉरेन्सिक रिपोर्टची एटीएसला प्रतिक्षा असून हा रिपोर्ट येताच हिरेन यांची हत्या कशी झाली याबाबत एटीएसने मिळवलेल्या पुराव्यावर शिक्कामोर्तब होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. (antillia case: mansukh hiren sedated using chloroform smothered to death)

काय घडलं त्या रात्री?

हिरेन यांची हत्या घडली त्या रात्री नेमकं काय घडलं? याचे पुरावे एटीएसच्या हाती लागले आहेत. निलंबित पोलीस कर्मचारी विनायक शिंदे आणि नरेश गोर या दोघांच्या चौकशीतून एटीएसच्या हाती अनेक पुरावे आले आहेत. त्याशिवाय एटीएसने सचिन वाझेंचं लोकेशन तपासलं आणि मोबाईल टॉवर आणि आयपीचं मूल्यांकनही केलं होतं. तसेच अनेक गाड्या फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवल्या होत्या. त्यातून काही गोष्टी समोर आल्या आहेत. त्या रात्री आरोपींनी हिरेन यांच्या नाकावर जबरदस्ती क्लोरोफॉर्म टाकण्यात आलं. त्यामुळे हिरेन तात्काळ बेशुद्ध पडले. त्यानंतर आरोपींनी त्यांची हत्या केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

पोस्टमार्टम रिपोर्ट काय सांगतो?

पोस्टमार्टमच्या रिपोर्टनुसार हत्येपूर्वी हिरेन यांच्या चेहऱ्यावर मार लागलेला होता. त्यांच्या चेहऱ्याच्या डाव्या बाजूला मार लागलेला होता. मृत्यूपूर्वी हा मार लागलेला होता. तसेच त्यांच्या अंगावर काही ठिकाणी मार होता. विशेषत: डोक्यालाही मार लागलेला होता, असं सूत्रांनी सांगितलं.

पाच रुमालाचं रहस्य काय?

हिरेन यांचा मृतदेह सापडला त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. त्यांच्या नाकात आणि तोंडात रुमाल कोंबण्यात आला होता. एकूण पाच रुमाल त्यांच्या तोंडात खूपसण्यात आले होते. हे रुमाल रोल करण्यात आले होते, असं सूत्रांनी सांगितलं.

हत्येच्या ठिकाणी वाझे उपस्थित होते

हिरेन यांची हत्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्या समोरच करण्यात आली. त्यानंतर वाझे यांच्या समोरच हिरेन यांचा मृतदेह मुंब्र्याच्या खाडीत फेकण्यात आला असावा अशी शक्यताही सूत्रांनी वर्तवली आहे. (antillia case: mansukh hiren sedated using chloroform smothered to death)

संबंधित बातम्या:

एनआयएची सचिन वाझेंवर आता UAPA कायद्यांतर्गत कारवाईची तयारी

सचिन वाझेंची वैद्यकीय तपासणी, NIA अधिकारी आणि डॉक्टर सॅम्पलसह रवाना

राजा उदार झाला अन् हाती भोपळा आला, फडणवीसांची जहरी टीका; ठाकरे सरकारला घायाळ करणारे १० मोठे मुद्दे

(antillia case: mansukh hiren sedated using chloroform smothered to death)

Non Stop LIVE Update
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.