AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं?’; घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना वर्षा गायकवाड संतापल्या

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेवर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे. बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं त्याठिकाणी उभारण्यात आली होती? असा सवाल वर्षा गायकवाड यांनी केलाय.

'बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं?'; घाटकोपरच्या दुर्घटनेवर बोलताना वर्षा गायकवाड संतापल्या
वर्षा गायकवाड
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 13, 2024 | 10:32 PM
Share

मुंबईच्या घाटकोपरमध्ये मोठी दुर्घटना घडली. घाटकोपरच्या छेडानगर येथे पेट्रोल पंपावर भलमोठं होर्डिंग कोसळलं. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला. तर 57 जण जखमी झाले आहेत. बचाव कार्य अजूनही सुरुच आहे. या घटनेवर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी संताप व्यक्त केला आहे. “मुंबईसह उपनगरांत आलेल्या सोसाट्याच्या वादळामुळे घाटकोपरमध्ये पेट्रोल पंपवर महाकाय होर्डिंग कोसळून त्याखाली अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न मुंबई अग्निशमन दल, एनडीआरएफ पथक करीत आहेत. अनेकांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे. मात्र या दुर्घटनेत काहींना दुर्दैवानं आपला जीव गमवावा लागला आहे. त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते”, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या.

“मुद्दा असा की, बेकायदेशीर होर्डिंग कोणाच्या मेहेरनजरनं त्याठिकाणी उभारण्यात आली होती आणि मुंबईत असे किती जाहिरात होर्डिंग्ज उभे आहेत. त्याचा आधी आढावा घेणं गरजेचं आहे. संबंधित दुर्घटनाग्रस्त होर्डिंग उभारण्यामागे दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे”, अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली.

वर्षा गायकवाड यांचा सरकारवर निशाणा

“दुसरीकडे रेल्वेसेवांवर देखील वादळाचा विपरीत परिणाम झाला आहे. लोकल सेवा खोळंबल्याचं चित्र आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महामार्गावरील वाहतुकीलाही मोठा फटका बसला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत अनेक भागांत पाणीपुरवठा सुद्धा खंडित झाल्याची माहिती मिळतेय. हवेच्या एका झोक्यानं ही अवस्था केली. एकूणच विस्कटलेली मुंबईची घडी पुन्हा बसवण्यात या सुस्तावलेल्या सरकारला भारी पडताना दिसत आहे. विकास मॉडेलच्या बाता ठोकणाऱ्या या सरकारला आहे ती मुंबई सांभाळता येत नाही, यांचा विकास नुसता कागदावर आणि जिभेवर.. कृती यांच्यानं होणं नाही”, अशी टीका वर्षा गायकवाड यांनी केली.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी मृतकांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तसेच या प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिलीय.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना