AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

MLC Election 2022 : टिळक, जगतापांनी खरंच गुप्त मतदानाचा भंग केला? नेमका नियम काय? वाचा सविस्तर

मतदान करतेवेळी त्यांनी इतर कोणाची मदत घेतली आणि मतदान केले हा आक्षेप आहे. आता त्यांनी केलेल्या मतदानावरून गुप्त मतदान पद्धतीचा भंग होतो का, हे पाहून निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे आहे.

MLC Election 2022 : टिळक, जगतापांनी खरंच गुप्त मतदानाचा भंग केला? नेमका नियम काय? वाचा सविस्तर
लक्ष्मण जगताप/मुक्ता टिळकImage Credit source: tv9
| Updated on: Jun 20, 2022 | 5:08 PM
Share

मुंबई : विधान परिषदेसाठी आज मतदान पार पडले. यावेळी भाजपा आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) आणि मुक्ता टिळक यांनी गुप्त मतदानाचा भंग केल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसने हा आक्षेप घेतला आहे. या दोघांनी ज्या पद्धतीने मतदान केले, त्यावरून काँग्रेसने (Congress) हा आक्षेप घेतला आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. मतदान करतेवेळी त्यांनी इतर कोणाची मदत घेतली आणि मतदान केले हा आक्षेप आहे. आता त्यांनी केलेल्या मतदानावरून गुप्त मतदान पद्धतीचा भंग होतो का, हे पाहून निवडणूक अधिकारी काय निर्णय घेतात हे महत्त्वाचे आहे. मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांनी मतपत्रिकेवर आपला पसंतीक्रम टाकल्यानंतर मतपत्रिकेवर सही केली आणि नंतर ती स्लीप फोल्ड करून ती दुसऱ्याच्या हातात दिली. त्यानंतर ते मतपेटीत टाकण्यात आले.

काय आहे नियम?

बॅलेट बॉक्समध्ये कोणाची मदत घेऊन मतदान टाकले यावरून गुप्त मतदानाचा भंग झाला का, हे आता निवडणूक अधिकारी तपासणार आहेत. याप्रकरणी अनंत कळसे म्हणाले, की कन्डक्ट ऑफ इलेक्शनमधील नियम 49 नुसार, एखाद्या मतदाराला त्याच्या शारीरिक मर्यादांमुळे तो मत टाकायला असमर्थ असेल, तर त्याने सहायकाची मदत घेऊ शकतो. सहायक 18 वर्ष पूर्ण झालेला असावा. तर सहायकावर एकच बंधन असते, ते म्हणजे त्याने मतदान हे गुप्त ठेवावे, अशाप्रकारचा हा नियम असल्याचे कळसे एबीपी नेटवर्कशी बोलताना म्हणाले.

काय आहे काँग्रेसचा आक्षेप?

काँग्रेसचे अतुल लोंढे म्हणाले, की कलम 37 अनुसार मतदाता हा आंधळा, अशिक्षित किंवा वृद्धापकाळामुळे असमर्थ असेल तर 18 वर्षावरील वाचू शकणाऱ्या व्यक्तीची मतदानासाठी मदत घेता येते. पण इथे अशी परिस्थिती नव्हती. मतदारांना स्वत: सही करून मतपत्रिका घेतली होती. त्यामुळे त्यांचे मत बाद केले पाहिजे, असे ते म्हणाले.

‘तोंडावर आपटतील ते’

विनाशकाले विपरितबुद्धी. तोंडावर आपटतील ते, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. त्यांना पराभव दिसत आहे. उलट गंभीर आजारी असताना दोघेही मतदानाला ते आले, त्यांना सॅल्यूट करतो, असे मुनगंटीवार म्हणाले. जेव्हा मतदानास समर्थ नसता त्यावेळी दुसऱ्याची मदत घेण्याचा नियम आहे. निवडणूक अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर, मार्गदर्शनानंतरच हे मतदान करण्यात आले आहे. त्यामुळे काँग्रेसचा आरोप, आक्षेप तकलादू आहे. ते तोंडावर आपटतील, असे मुनगंटीवार म्हणाले. मतदानच निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले, काँग्रेसच्या मार्गदर्शनाखाली नाही. त्यामुळे आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.

सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर
मुंबईत हवेचा दर्जा खालावला, AQI थेट 195 वर.
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?
अजित पवार बारामती हॉस्टेलमधून अचानक रवाना, दादा नेमके गेले कुठे ?.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....