AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, दिग्गज नेते मुंबईत येणार, अभूतपूर्व हालचाली, ‘त्या’ आमदारांवर आता कठोर कारवाई होणार?

काँग्रेस पक्षातील एक मोठी बातमी समोर येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. काँग्रेसचे दिग्गज नेते आता मुंबईत येणार आहेत. हे नेते महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांसोबत अतिशय महत्त्वाची चर्चा करणार असल्याची माहिती मिळत आहे.

काँग्रेसमध्ये मोठ्या घडामोडी, दिग्गज नेते मुंबईत येणार, अभूतपूर्व हालचाली, 'त्या' आमदारांवर आता कठोर कारवाई होणार?
नाना पटोलेImage Credit source: tv9 marathi
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 17, 2024 | 6:20 PM
Share

राज्यातील विधानसभा निवडणुका अवघ्या तीन महिन्यांवर आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेस पक्षाला आणि महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले आहे. विधानसभा निवडणुकीत असेच यश मिळवून राज्यात काँग्रेस विचाराचे सरकार आणण्यासाठी प्रदेश काँग्रेसने तयारी सुरु केली आहे. यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला येत्या शुक्रवारी १९ जुलैला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहेत. ते मुंबईत बैठका घेऊन निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. तसेच काँग्रेस नेते, पदाधिकारी, खासदार आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि के. सी. वेणुगोपाल तथा प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्या उपस्थितीत सकाळी १० वाजता गरवारे क्लब येथे बैठक होणार आहे. या बैठकीला काँग्रेस विधिमंडळ पक्ष नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, अविनाश पांडे, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गट नेते आ. सतेज (बंटी) पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, प्रणिती शिंदे, कुणाल पाटील यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत.

सकाळच्या सत्रानंतर दुपारी पुन्हा बैठक

या बैठकीनंतर दुपारी 2 वाजता प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे राज्यातील सर्व जिल्हाध्यक्ष, प्रदेश पदाधिकारी, जिल्हा प्रभारी, खासदार, आमदार, आघाडी संघटनांचे प्रमुख यांची संयुक्त बैठक होणार आहे. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे विश्लेषण केले जाणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच मतदार याद्या पुनरिक्षणाचा आढावा तसेच संघटनात्मक बाबींचा आढावा घेतला जाणार आहे, आणि रणनिती ठरवली जाणार आहे. या बैठकीला के. सी. वेणुगोपाल आणि रमेश चेन्नीथला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन नाना गावंडे यांनी दिली आहे.

बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत दोन महत्त्वाच्या मुद्द्यावंर चर्चा होण्याची शक्यता आहे. या बैठकीत सुरुवातीला विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होण्याची शक्यता आहे. विधानसभेला कोणकोणत्या जागा काँग्रेसने लढवाव्यात यावर बैठकीत चर्चा होणार आहे. महाविकास आघाडीत कोणत्या जागांवर काँग्रेसने दावा करावा यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. दुसरा अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विधान परिषद निवडणुकीत काही काँग्रेस आमदारांकडून करण्यात आलेलं क्रॉस व्होटिंग. या मुद्द्यावरही या बैठकीत चर्चा होणार आहे. विशेष म्हणजे विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या आमदारांवर बैठकीत चर्चा होऊन त्याच दिवशी कारवाई होण्याची शक्यता आहे.

Follow Us
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदी
रायगडच्या दिवेआगार समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू: आळंदीतील खाजगी क्लासची सहल
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT
प्रदीप पूर्णेकर प्रकरणाचा तपास वेगात; मुख्य सूत्रधाराच्या शोधासाठी SIT स्थापन, 23 अधिकारी...
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर मोठा निर्णय! शिंदे गटातील मीनाक्षी शिंदे यांच्या घराबाहेर...
वाल्मिक कराड प्रकरण तापलं; धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट
वाल्मिक कराड प्रकरण की... धनंजय मुंडेंची मुख्यमंत्र्यांसोबत अचानक भेट, चर्चेला उधाण
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’!
शेकडो जीव वाचवणाऱ्या कॅप्टन स्मित यांना फडणवीस म्हणाले ‘खरा हिरो’! भरभरून केलं कौतुक
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता खात्यात जमा, 3.27 लाख शेतकऱ्यांना दिलासा
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
पावसाअभावी सोयाबीनचे पीक उद्ध्वस्त; सिन्नरच्या शेतकऱ्यांसमोर मोठे संकट
उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
Udhhav Thackery : उद्धव ठाकरे अचानक प्रदीप पुर्णेकरांच्या कार्यालयाजवळ गेले, अन्...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी मोठी अपडेट समोर! ठाकरे गटातील नेत्याने शेअर केली धक्कादायक ऑडिओ क्लिप
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल
महाराष्ट्रातील दुष्काळामुळे जनावरांच्या किमती घसरल्या, शेतकरी हवालदिल, नुकसानाचा करावा लागतोय सामना