AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार”; काँग्रेसचा थेट भाजपला इशारा…

भाजपकडून सातत्याने महाराष्ट्रातील फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.

भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही एकत्र लढणार; काँग्रेसचा थेट भाजपला इशारा...
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Jun 13, 2023 | 10:39 PM
Share

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजपच्या डझनभर मंत्र्यांकडून अपमान केला गेला आहे. तर कालच वारकरी संप्रदायावर या सरकारने अन्याय करुन त्यांनी आपली खरी वृत्ती दाखवली असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्रमध्ये फुले,शाहू, आंबेडकर यांचा विचार संपवाण्याचा काम हे सरकार करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे. राज्यातील हे सरकार मनुवादी विचारसरणीचे सरकार आहे. त्यामुळेच डझनभर भाजपचा नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये आम्ही माऊलींचा आदर करत त्याचा सन्मान केला होता. तर सध्याचे सरकार मात्र जाणीवपूर्वक याविरोधात वर्तन करत असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना त्यांनी भाजप मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी आम्ही सर्व एकत्रच निवडणुका लढविणार असून महाराष्ट्र हा भाजपमुक्त झालेला असेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

यानिमित्ताने कर्नाटकमधील नागरिकांचेही आभार मानत त्यांनी मातोश्रीचेही त्यांनी आभार मानले आहेत. ज्या प्रमाणे कर्नाटकात काँग्रेसने बाजी मारली आहे, तसाच परिणाम आता महाराष्ट्रातही दिसेल असं मत त्यांनी व्यक्त केले.

भाजपकडून सातत्याने महाराष्ट्रातील फुले, शाहू आंबेडकर यांच्या विचारांना संपवण्याचा प्रयत्न केला जात आहे. तत्कालीन राज्यपाल आणि भाजपच्या नेत्यांनी आणि मंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला आहे.

तसेच महाराष्ट्रात वारकऱ्यांची प्रथा वर्षानुवर्षे चालत आली आहे, मात्र यावेळी नियोजनबद्ध पद्धतीने वारकरी संप्रदायावर लाठीचार्च करुन वारऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केला गेला असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

मनुस्मृतीला पुरोगामी संतांनी विरोध केला होता, त्यामुळे या प्रथेला कसे बंद करता येईल यासाठी लाठीचार्ज केला गेला असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी भाजपवर केला आहे.

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...