AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी छळ केला’; वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा गंभीर आरोप

सनदी अधिकारी पूजा खेडकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी वाशिम पोलिसांकडे थेट पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांवर केलेल्या आरोपामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

'पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी छळ केला'; वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांचा गंभीर आरोप
पूजा खेडकर
| Updated on: Jul 16, 2024 | 9:07 PM
Share

राज्यासह देशभर चर्चेत असलेल्या वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांना मोठा धक्का बसला आहे. उत्तराखंडमधील मसुरी येथील लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकॅडमीने महाराष्ट्रातून पूजा खेडकरचा प्रशिक्षण थांबवलं आहे. अशातच या प्रकरणामध्ये आता मोठी अपडेट समोर आली आहे. पूजा खेडकर यांनी पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला आहे. पुजा खेडकर पुण्यामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून होत्या मात्र तात्काळ त्यांची बदली वाशिम येथे करण्यात आली होती. प्रमाणपत्रांवरून आरोप होत असताना पूजा खेडकर यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर छळाचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

सोमवारी रात्री 11 च्या सुमारास वाशिम पोलीस पूजा खेडकर यांच्या शासकीय विश्रामस्थळी पोहोचले होते. त्यावेळी पोलिसांकडे त्यांनी पुणे जिल्हाधिकारी सुहास दिवे यांच्यावर छळ केल्याचा आरोप केला. यावेळी वाशिम पोलिसांनी तक्रारीची नोंद केली असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.  पूजा खेडकर यांनी तक्रार नोंदवली आहे मात्र आज त्यांना मसुरी येथीलराष्ट्रीय प्रशासन अकॅडमीने महाराष्ट्रातील प्रशिक्षण थांबवलं आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात 3जून 2024 ला पूजा खेडकर यांचं प्रशिक्षण सुरू झालेलं. मात्र एक महिन्यानंतर त्यांची बदली वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात झाली होती. यादरम्यान पूजा खेडकर यांनी त्यांच्या ऑडी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन असं लिहिल्याने वादाला सुरूवात झाली होती. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून 25 पानी अहवाल अप्पर सचिवांना पाठवण्यात आला. त्यानंतर त्यांची तात्काळ बदली वाशिम येथे झाली होती.

तुमचे जिल्हा प्रशिक्षण पुढे करण्यात आलं असून पुढील आवश्यक कारवाईसाठी तुम्हाला तात्काळ परत बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तुम्हाला महाराष्ट्र राज्य सरकारच्या जिल्हा प्रशिक्षण कार्यक्रमातून मुक्त करण्यात आले आहे. तुम्हाला शक्य तितक्या लवकर आणि 23 जुलै 2024 पर्यंत कोणत्याही परिस्थितीत अकॅडमीमध्ये हजर रहावं लागणार असल्याचं पत्रात म्हटलं आहे.

वाशिम येथे गेल्यावर आधाची लाल दिवा आणि खासगी केबिनमुळे त्या चर्चेत आल्या होत्या. त्यानंतर ओबीसी आणि दिव्यांग असल्याची प्रमाणपत्र दाखवल्याचे आरोप त्यांचेवर होऊ लागले. पूजा खेडकर यांच्या आईचा हातात बंदूक घेतलेला व्हिडीओ समोर आला. आता पूजा यांचे आई-वडील दोघे फरार असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत. खोट्या प्रमाणपत्रांचे आरोप सुरू असताना मसुरी अकॅडमीने राज्य सरकारला अहवाल देण्यासंदर्भात आदेश देण्यात आला होता. राज्य सरकारने हा अहवाल पाठवला असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.

नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा
शिंदेंना राज ठाकरेंचा लवचिक पाठिंबा, राजकीय वर्तुळात चर्चा.
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू
अकोल्यात राजकीय समीकरणं बदलली भाजपविरोधात एकजूट, वंचितचं नवं पर्व सुरू.