
मुंबई | 30 जुलै 2023 : मुंबईतील प्रतिष्ठीत इंडीयन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ( IIT ) मुंबई या शैक्षणिक संस्थेतही आता शाकाहारी विरुद्ध मासांहारी वाद पेटला आहे. या संस्थेच्या हॉस्टेल कॅंटीनमध्ये मासांहारी भोजन खाण्यावरुन एका विद्यार्थ्याचा दुसऱ्या एका विद्यार्थ्याने अपमान केल्याने वाद निर्माण झाला आहे. नॉन-व्हेज खाणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलच्या कॅंटीनमध्ये बसण्यास विरोध होत आहे.
आयआयटी पवईत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की ही घटना गेल्या आठवड्यात घडली आहे. हॉस्टेल क्रमांक 12 च्या कॅंटीनमध्ये काही विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करीत केवळ शाकाहारी व्यक्तींनाच येथे बसता येईल. जे लोक मासांहारी जेवण करतील त्यांना बळजबरी जागा खाली करावी लागेल असे पोस्टर्स होस्टेलमध्ये लावल्याचे वृत्त आजतक वाहिनीच्या वेबसाईडने दिले आहे.
काही महिन्यांपूर्वी संस्थेचे आहारासंबंधी कोणतेही धोरण नसल्याची माहीती आरटीआय अर्जाद्वारे काही विद्यार्थ्यांनी मिळाली होती. तरीही विद्यार्थ्यांना त्यांच्या भोजनाच्या श्रेणीनूसार वेगवेगळे बसविले जात होते. वेगळे – वेगळे बसण्याची व्यवस्था आजही संस्थेत कायम आहे. या प्रकरणात शाकाहारींना बसण्याची परवानगी अशी लावलेली पोस्टर्स विद्यार्थ्यांच्या संघटनेने हटविली आहेत. विद्यार्थ्यांच्या एका गटाने अशा प्रकारे वेगवेगळ्या रांगेत बसविल्याने विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव निर्माण केला जात आहे.