भारतीय नौदलातही कोरोनाचा शिरकाव, मुंबईतील 20 सैनिकांना संसर्ग

देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने आता भारतीय नौदलातही शिरकाव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Corona Infection in Naval Shore).

भारतीय नौदलातही कोरोनाचा शिरकाव, मुंबईतील 20 सैनिकांना संसर्ग
प्रविण शिंदे, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

|

Apr 18, 2020 | 11:01 AM

मुंबई : देशभरात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूने आता भारतीय नौदलातही शिरकाव केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे (Corona Infection in Naval Shore). मुंबईत भारतीय नौदलाच्या 20 कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. कोरोना संसर्ग झालेल्या सैनिकांवर उपचार सुरु आहेत. कोरोना संसर्गानंतर नौदलाकडून सर्व खबरदारी घेतली जात आहे.

कोरोना संसर्ग झालेल्या नौदल सैनिकांच्या संपर्कात आलेल्या इतरांचाही शोध घेतला जात आहे. त्यांच्याही कोरोना चाचणी घेतल्या जाणार आहेत. 7 एप्रिलला नौदलाचा एक सैनिक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. यानंतर त्याच्यासोबत राहणाऱ्या आणि संपर्कात आलेल्या नौदलाच्या इतरांची तपासणी करण्यात आली. यात हे 20 सैनिक कोरोना बाधित असल्याचं स्पष्ट झालं. या सर्वांना अद्याप कोरोनाची कोणतीही लक्षणं दिसलेली नाहीत.

राजस्थानमध्ये प्रभावी ठरलेल्या भिलारी मॉडेलनुसार कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढळल्यानंतर त्यांच्या संपर्कातील व्यक्ती मग त्यांना लक्षणं असो अथवा नसो कोरोना चाचणी घेतली जात आहे. हे रुग्ण जेथे आढळले तेथे राहणाऱ्या सर्वांना तात्काळ क्वारंटाईन करण्यात आलं आहे. तसेच नौदल परिसरातही लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. जहाजावरील किंवा पाणबुडीवर असणाऱ्या कुणालाही कोरोनाचा संसर्ग झालेला नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोरोना रुग्णांची अद्ययावत आकडेवारी:

जिल्हारुग्णबरेमृत्यू
मुंबई34396231899511535
पुणे 4395624056968144
ठाणे 2930522748165873
पालघर 4987247852939
रायगड72974697611613
रत्नागिरी1233611646425
सिंधुदुर्ग67776359180
सातारा60722571201858
सांगली51829492941800
नाशिक1374491281672093
अहमदनगर79880763801171
धुळे1887016902337
जळगाव 69604630981542
नंदूरबार 1144810157229
सोलापूर59754563791859
कोल्हापूर 50144480561684
औरंगाबाद59429509871289
जालना1671315779394
हिंगोली 53424497100
परभणी93327943313
लातूर 2692725245716
उस्मानाबाद 1853317413576
बीड2079618513577
नांदेड 2617022710692
अकोला 2030216111404
अमरावती 4331838752567
यवतमाळ 2198918875497
बुलडाणा 2086517605270
वाशिम 1135210120169
नागपूर1735471529593584
वर्धा 1614314254325
भंडारा1460413711315
गोंदिया 1485814440175
चंद्रपूर2598724485422
गडचिरोली93258994103
इतर राज्ये (महाराष्ट्रात उपचार सुरु)146091
एकूण2314413213407252861

संबंधित बातम्या :

पुण्यात 580 जणांना कोरोना संसर्ग, 47 जणांचा मृत्यू, हॉटस्पॉट ठरलेल्या भवानी पेठेसह कोठे किती रुग्ण?

LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

Corona | राज्यात दिवसभरात 31 रुग्णांची कोरोनावर मात, बाधितांची संख्या 3320 वर

पनवेलवरुन चालायला सुरुवात, मिळेल ते खायचं, नदीकाठी आंघोळ, अंधार पडला की वस्ती, 800 किमी चालून तरुण चंद्रपुरात

लॉकडाऊन काळात 50 हजार गुन्हे दाखल, 1 कोटींचा दंड वसूल, 10 हजार जणांना अटक

Corona Infection in Naval Shore establisment at Mumbai

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें