
देशात कोरोना व्हायरसने पुन्हा डोकेवर काढले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (ICMR) सोमवारी भारतात कोविड-19 व्हेरिएंट्सचे गंभीर लक्षण दिसत नाहीत. देशात ओमीक्रॉनचे 4 सब व्हेरिएंट्स दिसून आले आहे. तर केरळमध्ये सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने सोमवारी कोविडची आकडेवारी सादर केली. त्यानुसार, देशात कोविड-19 सक्रिय रुग्णांची एकूण संख्या 1009 वर पोहचली आहे. यामध्ये 752 नवीन रुग्ण वाढले आहेत.
चिंतेचा विषय नाही
ICMR चे महासंचालक डॉ. राजीव बहल यांनी सोमवारी या आजाराच्या संसर्गाविषयी माहिती दिली आहे. त्यानुसार, सध्या चिंतेचा विषय नाही. कोविडच्या नवीन स्वरुपाविषयी माहिती घेण्यात आली आहे. पश्चिम आणि दक्षिणेतून त्यासाठी काही नमुने गोळा करण्यात आले होते. यामध्ये कोविडचे नवीन व्हेरिएंट दिसले. पण ते गंभीर नाही, अशी माहिती बहल यांनी दिली. हे सर्व ओमीक्रॉनचे उप संसर्ग असल्याचे दिसले. यामध्ये LF.7, XFG, JN.1 आणि NB. 1.8.1 यांचा समावेश आहे.
सक्रिय रुग्णांमध्ये वाढ
बहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. पूर्वी दक्षिण भारतात, पश्चिम आणि उत्तर भारतात रुग्णांची संख्या वाढत आहे. सध्या सर्व केसेस विषयी एकात्मिक रोग देखरेख कार्यक्रमातंर्गत लक्ष ठेवण्यात येत आहे. यापूर्वी कोरोनाचे रुग्ण दोन दिवसात दुप्पट होत होते. पण सध्या अशा केसेस येत नसल्याचे आणि देशात सब व्हेरिएंट सक्रीय असल्याची माहिती त्यांनी दिली.
लोकांनी सामान्य सावधगिरीसंबंधी ज्या सूचना दिल्या आहेत. त्याचे पालन करण्याचे आणि वेळीच वैद्यकीय तज्ज्ञाकडे इलाज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कोणता ताप, सर्दी, पडसे अंगावर न काढण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या परिस्थिती गंभीर नसल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाने हातपाय पसरले
महाराष्ट्रात कोरोनाने हातपाय पसरले आहेत. सोमवारी राज्यात 7,830 सॅम्पल घेण्यात आले. त्यात 369 रुग्ण कोविड19 पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले. सर्वाधिक रुग्ण मुंबईत आढळले. मुंबईत काल 69 नवीन रुग्णांची भर पडली. सध्या राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या 278 च्या जवळपास आहे. तर राज्यात सोमवारपर्यंत कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा आकडा 4 वर पोहचला.