Covaxin | कोवॅक्सिनचा पहिला टप्पा यशस्वी, 50 जणांवर चाचणी

| Updated on: Jul 27, 2020 | 12:01 AM

कोरोना लस चाचणीचा हरियाणाच्या रोहतकमध्ये पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला

Covaxin | कोवॅक्सिनचा पहिला टप्पा यशस्वी, 50 जणांवर चाचणी
Follow us on

मुंबई : कोरोनावर मात करण्यासाठी भारत बायोटेक निर्मिती कोवॅक्सिनचा पहिला टप्पा पार (Covaxin Test First Part Completed Successfully) पडला आहे. कोरोना संक्रमणावर यशस्वीरित्या पहिला टप्पा पार पडला. कोरोना लस चाचणीचा हरियाणाच्या रोहतकमध्ये पहिला टप्पा यशस्वीरित्या पार पडला (Covaxin Test First Part Completed Successfully).

50 लोकांना ही लस देण्यात आली होती, अशी माहिती रोहतकच्या मेडिकल विभागच्या प्रमुख डॉ. सविता वर्मा यांनी दिली आहे. कोवॅक्सिनची पहिल्या लस चाचणीमध्ये कुठलाही अडथळा आला नाही. 50 लोकांना लस दिली आहे, हे सर्व लोक बरे आहेत.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज

भारत बायोटेक कंपनीकडून कोरोनाची पहिली लस तयार

भारत बायोटेक कंपनीने पहिल्यांदा कोरानाची लस तयार केली. या लसीला केंद्र सरकारकडून मानवी चाचणीसाठी परवानगीही मिळाली. त्यानंतर आता या लसीच्या मानवी चाचणीची प्रक्रियेचा पहिला टप्पाही यशस्विरित्या पार पडला आहे. भारत बायोटेक कंपनीने आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्स्टिट्यूट ऑफ विरोलॉजी यांच्यासोबत मिळून ही लस तयार केली आहे (Covaxin Test First Part Completed Successfully).

भारत बायोटेक कंपनीने तयार केलेल्या लसीचं नाव कोवॅक्सिन (Covaxin) असं आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (सीडीएससीओ), आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने या लसीच्या पहिल्या आणि दुसर्‍या टप्प्यातील क्लिनिकल चाचण्यांना मान्यता दिली.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनावर लस तयार करण्यासाठी हजारो वैज्ञानिक आणि संशोधक काम करत आहे. जगातील बहुतेक देश लसीचं काम करत आहेत. जगभरात 100 पेक्षा जास्त वैज्ञानिक संस्था या कामात अहोरात्र मेहमत घेत आहेत. भारतातही अनेक वैज्ञानिक आणि संशोधक प्रयत्न करत आहेत. यादरम्यान, भारत बायोटेकने पहिल्या लसीचं घोषणा केली. त्यामुळे संपूर्ण जगाचं लक्ष या लसीकडे लागून आहे.

Covaxin Test First Part Completed Successfully

संबंधित बातम्या :

Corona Vaccine | ऑक्सफर्डची कोरोना प्रतिबंधात्मक लस डिसेंबरमध्ये बाजारात, सिरम इन्स्टिट्यूटचा दावा

गुड न्यूज | ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या कोरोना लसीची सुरुवातीची चाचणी यशस्वी, लसीमुळे दुहेरी संरक्षण