छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आता सौंदर्य प्रसाधन केंद्र;रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी एक सकारात्मक पाऊल

बॉडी मसाज चेअरद्वारे मसाजच्या सुविधा, पात्र  फिजिओथेरपिस्टद्वारे फिजिओथेरपी, केशभूषा, शेव्हिंग, फेशियल अशा विविध सलून सेवा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. गैर-शुल्क (नॉन-फेअर) महसूल उपक्रमांतर्गत असे अनेक उपक्रम घेतले जात आहेत, त्यामुळे त्याया फायदा प्रवाशांना होणार आहे, त्यातून रेल्वेला मोठा महसूल मिळणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर आता सौंदर्य प्रसाधन केंद्र;रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी एक सकारात्मक पाऊल
महसूल, पार्सल कमाई आणि तिकीट तपासणीमध्ये मध्य रेल्वेची उत्कृष्ठ कामगिरीImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 8:25 PM

मुंबईः भारतीय रेल्वेच्या सर्व झोनमध्ये गैरशुल्क (नॉन-फेअर) महसुलामध्ये पहिल्या क्रमांकाचा मान मध्य रेल्वेला (Central Railway) देण्यात आला आहे. 1 एप्रिल 2021 ते 20 मार्च 2022 या कालावधीत, याअंतर्गत 28.88 कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे. मध्य रेल्वेला हा मिळाला महसूल मागील वर्षाच्या महसुलापेक्षा (Revenue) 38 टक्के अधिक आहे. या उपक्रमामुळे रेल्वेच्या महसुलामध्ये वाढ होणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच याचा प्रवाशांसाठी होणार असून सौंदर्य प्रसाधन (Cosmetics) क्षेत्रातील अनेक सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न या उपक्रमात रेल्वेने सुरु केला आहे. या उपक्रमांचा फायदा जसा प्रवाशांना होणार आहे त्याच पद्धतीने महसुलाच्या दृष्टीने मध्य रेल्वेलाही याचा फायदा होणार आहे.

मुंबई विभागाने 1 एप्रिल 2021 ते 23 मार्च 2022 या कालावधीसाठी 21.96 कोटींचा महसूल गोळा करुन मुंबई विभाग आघाडीवर राहिले आहे. मुंबई विभागाने मध्य रेल्वे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गैरशुल्क महसूल अंतर्गत प्रथमच “वैयक्तिक सौंदर्य प्रसाधन केंद्रे” सुरू केली आहेत.

75 लाख रुपयांचा महसूल मिळणार

या उपक्रमामुळे 5 वर्षांसाठी 75 लाख रुपयांचा महसूल मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावरील वैयक्तिक सौंदर्य प्रसाधन केंद्राचे (पर्सनल केअर सेंटर) बांधकाम, संचालन, देखभाल आणि व्यवस्थापन यासाठीचे कंत्राट रु. 14,77,000/- प्रतीवर्ष या प्रमाणे पाच वर्षांच्या कालावधीसाठी देण्यात आले आहेत.

या संकल्पनेअंतर्गत, परवानाधारकांना आपत्कालीन, जेनेरिक आणि आयुर्वेदिक औषधे, वैयक्तिक सौंदर्य प्रसाधन वस्तू इत्यादीची विक्री करण्याची परवानगी दिली जाणार आहे.

सलून सेवा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध

बॉडी मसाज चेअरद्वारे मसाजच्या सुविधा, पात्र  फिजिओथेरपिस्टद्वारे फिजिओथेरपी, केशभूषा, शेव्हिंग, फेशियल अशा विविध सलून सेवा वापरकर्त्यांसाठी उपलब्ध असणार आहेत. गैर-शुल्क (नॉन-फेअर) महसूल उपक्रमांतर्गत असे अनेक उपक्रम घेतले जात आहेत, त्यामुळे त्याया फायदा प्रवाशांना होणार आहे, त्यातून रेल्वेला मोठा महसूल मिळणार आहे.

संबंधित बातम्या

खाऊंगा भी, खिलाऊंगा और खानेवाले को सुरक्षा दुंगा, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर अमृता फडणवीसांनीही डिवचलं

Gold Price Today : चांदी 68 हजारच्या पार, तर सोनंही महागलं! जाणून घ्या आजचा दर

बार्शीचे आमदार Rajendra Raut यांना धमकी- Devendra Fadnavis यांचा गंभीर आरोप

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.