Uddhav Thackeray: देशात सध्या अघोषित आणीबाणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा, साहित्यिकांच्या पाठिंब्याच्या भेटीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?

अनेक साहित्यिक, लेखक-कवी व महाराष्ट्र अभ्यासू गटाने उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या अनौपचारिक बैठकीत राज्यातील सध्याच्या गढूळ राजकीय परिस्थितीवर सर्व साहित्यिक आणि अभ्यासू नागरिकांनी दुःख व्यक्त करत साहित्यिक अस्वस्थ आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांनी केलेले काम व आताचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याबाबत आदर वाढविणारे आहेत. आम्ही आपल्या सोबत आहेत हे सांगायलाच ही सदिच्छा भेट असल्याचे कवयित्री नीरजा यांनी सांगितले.

Uddhav Thackeray: देशात सध्या अघोषित आणीबाणी, सुप्रीम कोर्टाचा निर्णय लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा, साहित्यिकांच्या पाठिंब्याच्या भेटीत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
साहित्यिकांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा
Image Credit source: social media
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: संदिप साखरे

Aug 14, 2022 | 7:28 PM

मुंबई- सदैव राजकीय नेत्यांनी गजबजलेल्या मातोश्री या शिवसेना (Shivsena)पक्षप्रमुख उद्धव ठाकरे  (Uddhav Thackeray)यांच्या निवासस्थानी राज्यातील साहित्यिक, लेखक, कवी (writers, poet) यांची गर्दी झाली होती. निमित्त होतं साहित्यिक आणि अभ्यासू महाराष्ट्रीय सदस्यांसोबत आयोजित सदिच्छा भेटीचं. या भेटीत गेल्या काही दिवसांत सुरु असलेल्या राज्यातील घडामोडींमुळे साहित्यिक, लेखक, कवी, विचारवंत अस्वस्थ असल्याचा सूर उमटला. या सगळ्यातही उद्धव ठाकरे यांनी जो लढा दिला तो गौरवास्पद आहे आणि त्यांच्या सोबत राज्यातील साहित्यिक असल्याची भावना अर्जुन डांगळे यांनी व्यक्त केली आहे. या बैठकीला साहित्यिक अर्जुन डांगळे, मेधा कुलकर्णी, कवी अरूण म्हात्रे, नीरजा, डॉ.महेश केळुसकर, हेमंत कर्णिक, रवींद्र पोखरकर आदी अनेक जण उपस्थित होते.

उद्धव ठाकरेंचा लढा आदर वाढवणारा

अनेक साहित्यिक, लेखक-कवी व महाराष्ट्र अभ्यासू गटाने उद्धव ठाकरे यांची सदिच्छा भेट घेतली. या अनौपचारिक बैठकीत राज्यातील सध्याच्या गढूळ राजकीय परिस्थितीवर सर्व साहित्यिक आणि अभ्यासू नागरिकांनी दुःख व्यक्त करत साहित्यिक अस्वस्थ आहेत. परंतु उद्धव ठाकरे यांनी केलेले काम व आताचे प्रयत्न उद्धव ठाकरे यांच्याबाबत आदर वाढविणारे आहेत. आम्ही आपल्या सोबत आहेत हे सांगायलाच ही सदिच्छा भेट असल्याचे कवयित्री नीरजा यांनी सांगितले. साहित्यिक, लेखक, कवी आणि संशोधकांची ही मातोश्री भेट नीलम गोर्हें यांच्या पुढाकाराने पार पडली. या भेटीत सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर सखोल चर्चा झाली.

एकाधिकारशाही अमान्य, आघाडीला पाठिंबा

या अनौपचारिक बैठकीत साहित्यिक अर्जुन डांगळे व उपस्थित साहित्यिक यांनी सध्याच्या वातावरणाबाबत साहित्यकही कृतिशील असल्याचे सांगितले. सगळ्या राजकीय पक्षांना संपवण्याचा, विरोधकांना संपवण्याचा डाव खेळला जात आहे. अशा वेळी अस्वस्थ होणार्‍या अनेक लेखक कवींना महाविकास आघाडीकडून थोड्या आशा होत्या. त्यामुळेच धर्माच्या नावावर देशात विद्वेष पसरवण्याच्या काळात आघाडीसोबत आहोत, असा सूर होता. एकाधिकारशाही न मानणारे, अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे सारे संवेदनशील लेखक-कवी आहेत हे सांगण्यासाठी ही सदिच्छा भेट घेतली असल्याचे उपस्थित साहित्यिकांनी व अभ्यासू गटाच्या सदस्यांनी सांगितले.

सुप्रीम कोर्टातील निकाल देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा- उद्धव

या भेटीत उद्धव ठाकरे यांनी सगळ्यांचे आभार मानले. संघर्षाच्या काळात आपण सर्व आमच्यासोबत आलात, त्याबद्दल आपले आभार मानतो. असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्याबाबत सुप्रीम कोर्टात होणाऱ्या सुनावणीत, देशातील लोकशाहीचे भवितव्य ठरवणारा असल्याचेही त्यांनी सांगितले. सध्या देशात अघोषित आणीबाणी सुरू आहे. सोबत असलेले लोक आपले गुलाम राहिले पाहिजे अशी भावना सध्या देशात दिसत आहे. प्रादेशिक पक्ष किंबहुना प्रादेशिक अस्मिता नष्ट करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. मुळात आपण राजकारणी नाही, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करायचे होते. पंरतु परिस्थितीनुसार व जिद्दीने मुख्यमंत्री झालो होतो त्यात देखील चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मराठी भाषा भवन उभारणार – उद्धव

आपल्या सर्वांचा उपयोग मराठी भाषा भवन उभे करण्यात करायचा आहे. यासंदर्भात आपल्या भेटी घेण्याची इच्छा होती, मात्र कोरोनाच्या काळात शक्य झाले नाही. असे उद्धव यांनी सांगितले. परंतु आपण यापुढे भेटीत सातत्य ठेवू, तसेच मराठी भाषा भवन आणि आपले साहित्य पुढील पिढीला देण्यासाठी कटिबद्ध राहू असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. रंगभूमीची परंपरा जोपासणारे दालन उभारण्यासाठी सर्व साहित्यिकांनी साथ देण्याचे आवाहनही ठाकरे यांनी यावेळी केले.

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें