Dahihandi Insurance 2022: गोविंदांना मिळणार 10 लाखांचे विमाकवच, भाजपचा उपक्रम

दहीहंडीचा सोहळा अनेकजण डोळा भरून पाहतात मात्र या सोहळ्यात जखमी झालेल्या गोविंदांकडे कानाडोळ करण्यात येतो. भाजप तर्फे उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना  10 लाख रुपयांचे विमा कवच देणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा भाजप उतरविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Dahihandi Insurance 2022: गोविंदांना मिळणार 10 लाखांचे विमाकवच, भाजपचा उपक्रम
दहीहंडी उत्सव Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Aug 05, 2022 | 12:51 PM

दहीहंडी (Dahihandi) हा महाराष्ट्रासाठी आणि विशेष म्हणजे मुंबईसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे. मुंबईच्या दहीहंडीची चर्चा जगभरात होत असते. हा उत्सव जितका लोकप्रिय आहे तितकाच यात भाग घेणाऱ्या गोविंदांसाठी तो जोखमीचा देखील आहे. दही हंडीच्या थरावरून पडल्याने अनेक गोविंदांनी आपले प्राण गमविले तर अनेकांना कायमचे अपंगत्व आलेले आहे. दहीहंडीचा सोहळा अनेकजण डोळा भरून पाहतात मात्र या सोहळ्यात जखमी झालेल्या गोविंदांकडे कानाडोळ करण्यात येतो. अपघातामुळे अनेक गोविंदांच्या कुटुंबाची आर्थिक घडी विस्कटून जाते. या सर्व बाबी ध्यानात घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने भाजप (BJP) तर्फे उत्सवात सहभागी होणाऱ्या गोविंदांना  10 लाख रुपयांचे विमा (10 lakh insurance) कवच देणार आहेत. स्पर्धेत सहभागी होणाऱ्या गोविंदांचा विमा भाजप उतरविणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

कायमचे अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास मिळणार 10 लाख रुपये

दहीहंडीच्या उत्सवात सहभागी झालेल्या गोविंदांना अपंगत्व आल्यास किंवा त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. भाजपच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले आहे. जास्तीत जास्त गोविंदा पथकांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि सुरक्षित दहीहंडीचा उत्सव साजरा करावा असे आवाहन करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे दहीहंडीच्या उत्सवाला ब्रेक लावण्यात आला होता. यंदा मात्र हा उत्सव निर्बंधमुक्त साजरा होणार आहे. दही हंडीच्या थरांचे बंधनही सर्वोच्च न्यायालयाकडून हटविण्यात आले आहे. तसेच आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्थेकडून तब्बल 21 लाखाचे पहिले पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे. यामुळे गोविंदांमध्ये उत्सवाचे वातावरण आहे. त्यात आता 10 लाखांचे विमा कवच मिळणार असल्याने अधिक समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Non Stop LIVE Update
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ
मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी, लाथा-बुक्क्यांनी मारहाण; बघा व्हिडीओ.