AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांचं शिक्षण आणि व्यवसाय माहित आहे काय?; बायोडेटा काय सांगतो?

लोकसभेमध्ये नणंद विरूद्ध भावजयची लढत एकदम काँटे की टक्कर असणार आहे. सुप्रिया सुळे खासदार म्हणून सलग तीनवेळा निवडून आल्या आहेत. मात्र आता त्यांच्याविरूद्ध घरातीलच उमेदवार म्हणजेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचं आव्हान असणार आहे. सुनेत्रा पवारांविषयीची सर्व माहिती जाणून घ्या.

सुनेत्रा पवार यांचं शिक्षण आणि व्यवसाय माहित आहे काय?; बायोडेटा काय सांगतो?
Sunetra Pawar Marathi Information
| Updated on: Mar 31, 2024 | 10:09 PM
Share

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती मतदार संघाकडे राज्याचेच नाहीतर देशाचं लक्ष लागलेलं आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यामध्ये हा सामना होणार आहे. नणंद विरूद्ध भावजयमधील लढतीमध्ये कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उभ्या राहिलेल्या सुनेत्रा पवार यांच्याबद्दलचा सर्व माहिती जाणून घ्या.

सुनेत्रा पवार यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1963 मध्ये धाराशिवमधील तेर या गावामध्ये झालाय. सुनेत्रा पवार यांच्या वडिलांचं नाव बाजीराव भगवंतराव पाटील तर आईचे नाव दौपदी बाजीराव पाटील आहे. सुनेत्रा पवारांचं शिक्षण बी. कॉम झालं असून व्यवसाय हा शेती आहे. सुनेत्रा पवारांनी वाचन, निसर्ग फोटोग्राफी, चित्रकला आणि समाजकार्यामध्ये विशेष आवड आहे.

सुनेत्र पवार या बारामती हायटेक टेक्सटाईल पार्क, बारामती, एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडीया (एनजीओ) बारामतीच्या अध्यक्ष आहेत. त्यासोबतच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या सदस्या, सावित्रीबाई फुल पुणे विद्यापीठामध्ये व्यवस्थापन समितीच्य माजी सदस्या, कृषी उद्योग मूल शिक्षण संस्था, काहाटी, बारामती क्लबच्याही विश्वस्त आहेत.

सुनेत्रा पवार यांना उल्लेखनीय कार्याबद्दल चिंचवड देवस्थान तर्फे ‘श्रीमत् महासाधू श्रीमोरया गोसावी जीवन गौरव पुरस्कार 2021’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने ‘जीवन गौरव पुरस्कार 2023’ आणि ‘ग्रीन वॉरीयर पुरस्कार पुणे. लोकमत तर्फे ‘आऊटस्टँडींग वुमन अॅवार्ड’ आणि ‘लोकमत आयकॉन पुरस्कार, पुणे. तर ग्रामीण भागात जागरूकता निर्माण केल्याबद्दल ईटी जेन नेक्स्ट आयकॉन्स पुरस्कार आणि राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार 2024 असे पुरस्कार मिळाले आहेत.

सुनेत्रा पवार यांचं आरोग्य क्षेत्रामध्येही योगदान असून यामध्ये मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर, कर्करोग जनजागृती तसेच मासिका जागर अभियान, महिलांसाठी आरोग्यविषयक शिबीरांचे आयोजन त्यांनी केलं आहे. शिक्षण क्षेत्रामध्ये विद्या प्रतिष्ठान तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यमातून शिक्षणाच्या क्षेत्रात काम केलं आहे. विज्ञान प्रदर्शन आणि जत्रांच्या माध्यमातून मुलांच्या जिज्ञासू वृत्तीला प्रोत्साहन दिलं आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये गेल्या 23 वर्षापासून समाजाच्या विविध क्षेत्रात सातत्याने कार्यस्त आहेत. काटेवाडी गावात त्यांचं सन 2000 पासून सामाजिक कार्य सुरु आहे. समाजाच्या सर्वांगिण प्रगतीसाठी सुनेत्रा पवारांनी सातत्याने काम केलं आहे.

शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या..
शरद पवार जे ठरवतील तेच माझ्यासाठी... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत...
ठाकरेंच्या नेत्याने भाजपाच्या मुंबई अध्यक्षालाच घेरलं; बाहुली म्हणत....
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप
ठाकरे बंधूंची युती जाहीर...घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप.
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं
जागावाटपाचा फॉर्म्युला फिक्स! शिंदे-चव्हाणांमध्ये 5 तास खलबतं.
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा
काँग्रेसचा सर्वात मोठा निर्णय, महत्त्वाच्या पक्षाशी थेट युतीची घोषणा.
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का
राज ठाकरे अन् उद्धव ठाकरेंच्या युतीची घोषणा अन् मनसेला पहिला धक्का.
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल
हे बडवे, कारकून कोण? 'लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शेलारांचा ठाकरेंना सवाल.
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
नितेश राणे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी.
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ
बाप, औकात अन ओम फट स्वाहा, मुंबईतील 'त्या' बॅनरनं राजकीय वर्तुळात खळबळ.
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट
ठाकरे बंधूंच्या युतीवर चित्रा वाघ यांची बोचरी टीका, बघा काय केलं ट्विट.