Devendra Bhuyar : मग मतं मागायला येऊ नका, आम्ही काय आमच्या वावरातल्या कामासाठी निधी मागतोय का? वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर संतापले अपक्ष आमदार
निधीवरूनही देवेंद्र भुयार संतापल्याचे पाहायला मिळाले. मग मतं मागायला येऊ नका, आम्ही काय आमच्या वावरातल्या कामासाठी निधी मागतोय का? असा संतप्त सवाल त्यांनी विजय विडेट्टीवरांना केला आहे. कारण वडेट्टीवारांनी कालच निधीबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं.

मुंबई : शिवसेनेचे संजय पावर (Sanjay pawar) पराभूत झाले. त्यानंतर भडकलेल्या संजय राऊतांनी (Sanjay Raut) थेट काही अपक्ष आमदारांनी दगा दिल्याचा आरोप केला एवढेच नाही तर अपक्ष आमदारांची नावं थेट मीडियासमोर घेतली. त्यात अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar)यांचेही नाव घेतलं. त्यानंतर आता देवेंद्र भुयारही आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट शरद पवारांची भेट घेटली आणि ते संजय राऊत यांचीही ते भेट घेणार आहे. संजय राऊतांकडून गैरसमजुतीतून हा प्रकार घडल्याचे शरद पवारांनी देवेंद्र भुयारांना सांगितले. तर दुसरीकडे निधीवरूनही देवेंद्र भुयार संतापल्याचे पाहायला मिळाले. मग मतं मागायला येऊ नका, आम्ही काय आमच्या वावरातल्या कामासाठी निधी मागतोय का? असा संतप्त सवाल त्यांनी विजय विडेट्टीवरांना केला आहे. कारण वडेट्टीवारांनी कालच निधीबाबत एक मोठं वक्तव्य केलं होतं.
वडेट्टीवार काय म्हणाले होते?
राज्यसभेच्या निवडणुकीत दगा देणाऱ्या अपक्ष आमदारांना यापुढे पाहिले जाईल. असा इशारा मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिला होता. पार पडलेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत ज्यांनी दगा दिला त्यांना आता निधी देताना विचार करावा लागेल आम्ही आतापर्यंत अपक्ष आमदारांना झुकत माप दिले आहे तेसच विकासाच्या कामे आमच्या बरोबरीने करुन घेतली आहेत. आत्ता निवडणुकीत मतदान करताना त्याचा विचार केला गेला नाही , यापुढे अपक्ष आमदारांना निधी दिल्या जाणार नाही, असे धक्कादायक विधान वडेट्टीवारांनी काल केले होते. त्यावरूनच आता भुयार आक्रमक झाले आहेत.
संजय कुटेंचा पलटवार
तर भाजपच्या संजय कुटे यांनी विजय वडेट्टीवार यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. संजय राऊत हे मातोश्रीचे आणि विजय वडेट्टीवार हे सोनिया गांधींचे घरगडी असतील. संजय राऊत आणि वडेट्टीवार यांच्या व्यक्तव्यावर आचारसंहिता भंगाबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करायची का नाही ते अपक्ष आमदार ठरवणार आहेत. तसेच आमदारांचा निधी कुणीही थांबवू शकत नाही आणि तो निधी कसा मिळवायचा हे अपक्ष आमदारांना माहीत आहे. अपक्ष आमदार हे स्वाभिमानी आहेत. ते कुणाचे घरगडी नाहीत, असा घणाघात भाजप आमदार संजय कुटे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्यावर केला होता. तर मी सुरूवातीपासूनच राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीसोबत आहे. त्यामुळे राऊतांनी असे वक्तव्य करणं चुकीचं आहे. अशांनी मतदारांच्या नजरीत आमची किंमत राहणार नाही, अशी भितीही देवेंद भुयार यांनी व्यक्त केली आहे.
