AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vitthal Mandir : दर्शनाला आले “राव” भाविकांची धावाधाव, विभागीय आयुक्तांमुळे किलोमीटरच्या रांगा, तर मंदिरातील लेपन प्रक्रियाही पूर्ण

आज द्वादशी आणि रविवार असल्याने पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन किलोमीटर दर्शन रांग गेली आहे. सध्या 4 ते 5 तास वेळ दर्शनासाठी लागत आहे. अशातच रांग बंद करून व्हीआयपी दर्शन देण्याचा हट्ट मंदिर प्रशासनानं धरला.  त्यामुळे आता भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

Vitthal Mandir : दर्शनाला आले राव भाविकांची धावाधाव, विभागीय आयुक्तांमुळे किलोमीटरच्या रांगा, तर मंदिरातील लेपन प्रक्रियाही पूर्ण
दर्शनाला आले "राव" भाविकांची धावाधाव, विभागीय आयुक्तांमुळे किलोमीटरच्या रांगा, तर मंदिरातील लेपन प्रक्रियाही पूर्णImage Credit source: tv9
दादासाहेब कारंडे
दादासाहेब कारंडे | Updated on: Jun 12, 2022 | 4:22 PM
Share

पंढरपूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात (Pandharpur Vitthal mandir) रोज दर्शनाला हजारो भाविक येत असतात. त्यात आता आषाढी वारी जवळ आली असल्याने दिवसेंदिवस मंदिरात (Vitthal Mandir) भाविकांची गर्दी वाढू लागली आहे. मात्र आज मंदिरात भक्तांना तासंतास रांगेत ताटकळत उभं राहवं लागलंय. आणि त्याला कारण ठरलंय, विभागीय आयुक्त सौरभ राव यांची पंढरपूर वारी. विभागीय आयुक्त सौरभ राव (Sourabh Rao)दर्शनासाठी पंढरपूरला पोहोचले. मात्र पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्या व्हीआयपी दर्शनासाठी वारकऱ्यांची दर्शन रांग थांबवली, त्यामुळे भाविकांची मोठी गैरसोय झाल्याचे दिसून आले. आज द्वादशी आणि रविवार असल्याने पंढरपूरमध्ये दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दोन किलोमीटर दर्शन रांग गेली आहे. सध्या 4 ते 5 तास वेळ दर्शनासाठी लागत आहे. अशातच रांग बंद करून व्हीआयपी दर्शन देण्याचा हट्ट मंदिर प्रशासनानं धरला.  त्यामुळे आता भाविकांमध्ये नाराजी पसरली आहे.

भाविकांची गर्दी वाढली

पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनासाठी जगभरातून भाविक हे पंढरपुरात दाखल होतात. नियमित दिवशीही पंढरपुरात दर्शनासाठी वेळ लागतो. मात्र अशा व्हीआयपी दर्शनामुळे भक्तांना आणखी काही तास रांगेत उभं राहवं लागलं आहे. अशी वेळ ही पहिल्यांदाच आली नाही. याआधीही अशा व्हीआयपी दर्शनामुळे भाविकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे आता वारकरी वर्ग नाराज आहे. ऐन वारीच्या तोंडवरचा हा प्रकार सध्या पंढरपुरात चर्चेत आहे. त्यामुळे आता वारकरी आक्रमक होण्याची शक्यता आहे.

लेपन प्रक्रिया पूर्ण

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूरच्या रूक्मिणी मातेच्या मूर्तीच्या चरणावरील‌ लेपन प्रक्रिया पूर्ण झाली आहे. ही प्रक्रिया रात्री आणि दिवसा मिळून पाच ते सहा तास चालली होती. सिलिकॉन पावडर आणि इतर साहित्य वापरून झीज झालेल्या ठिकाणी चरण पूर्ववत केले. औरंगाबाद येथील भारतीय पुरातत्व विभागाचे अधिकारी श्रीकांत मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली ही लेपन‌ प्रक्रिया पार झाली.

पदस्पर्श दरर्शन‌ बंद राहणार

दरम्यान आज दिवसभर रूक्मिणी मातेचे नित्योपचार आणि पदस्पर्श दरर्शन‌ बंद राहणार आहे.रूक्मिणी मूर्तीच्या चरणाची झीज झाली होती. त्यानंतर भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिरात येवून मूर्तीची पाहाणी केली होती. त्यानंतर काल रात्री मूर्तीच्या चरणावर लेपन प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आणि आज दुपारी ती प्रक्रिया पुर्ण झाली असल्याची माहिती मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार