ज्यांनी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलं त्याना काय शिक्षा झाली पाहिजे?; फडणवीसांचं रोखठोक उत्तर

लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप मंत्र्याच्या मुलाला काय शिक्षा झाली पाहिजे? यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच रोखठोक उत्तर दिलं आहे. (devendra fadnavis reaction on lakhimpur kheri violence case)

ज्यांनी शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडलं त्याना काय शिक्षा झाली पाहिजे?; फडणवीसांचं रोखठोक उत्तर
devendra fadnavis
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 1:42 PM

मुंबई: लखीमपूर येथे शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजप मंत्र्याच्या मुलाला काय शिक्षा झाली पाहिजे? यावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच रोखठोक उत्तर दिलं आहे. शिक्षा ठरवण्याचा अधिकार तुम्हाला आणि मला नाही. न्यायालय या संदर्भात कारवाई करेलच. पण कुणी तरी कुणाला चिरडलं म्हणजे इतरांनाही चिरडण्याचा अधिकार मिळतो असं नाही, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी रोखठोक भूमिका मांडली.

देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र बंदवरून आघाडी सरकारवर टीका केली. यावेळी त्यांना लखीमपूर हिंसेतील आरोपींना काय शिक्षा झाली पाहिजे असा सवाल करण्यात आला. त्यावर त्यांनी थेट उत्तर दिलं. या करिता शिक्षा ठरवण्याचा अधिकार तुमचा आणि माझा नाही. तो न्यायालयाचा अधिकार आहे. न्यायालय त्या संदर्भात योग्य ती शिक्षा देईल. त्यामुळे कुणी तरी गाडीखाली चिरडलं म्हणजे इतरांना चिरडण्याचा अधिकार कुणाला मिळालेला नाही. ते जेवढं निंदणीय असेल तेवढंच त्याला समोर ठेवून असं काम करणंही निंदणीय असेल, असं फडणवीस म्हणाले.

राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न

लखीमपूरची घटना गंभीर आहे, तिथलं सरकार त्यावर कारवाई करत आहे. आजचा बंद हा त्या घटनेला संवेदना दाखवण्यासाठी नाही, पण राजकीय पोळी भाजता येईल का, या संकुचित विचाराने केलेला हा बंद आहे. या बंदला लोकांचा प्रतिसाद नाही, पण प्रशासनाची दमदाटी, पोलिसांची दमदाटी करुन, जीएसटी, यांचा वापर करुन बंद केला जात आहे, असा आरोपही फडणवीसांनी केला आहे.

हा तर ढोंगीपणाचा कळस

महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपण समोर आला आहे. हे पूर्णपणे ढोंगी सरकार आहे. लखीमपूरच्या घटने करता महाराष्ट्रात बंद केला जातो. पण महाराष्ट्रातील पूरग्रस्तांसाठी हे सरकार एकही पैसा देत नाही. शेतकरी संकटात आहे. हे सरकार आल्यापासून दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. सरकारने बांधावर जाऊन 25 हजाराच्या घोषणा केल्या, 50 हजाराच्या घोषणा केल्या, पण या सर्व घोषणा हवेत विरल्या. विविध आपत्तीत मदतच केली नाही. केली तरी तोकडी केली. त्यामुळे घटक पक्षच म्हणून लागले भाजपचं सरकार बरं होतं. हे सरकार मदत करत नाही. त्यामुळे आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे, अस फडणवीस म्हणाले.

हे तर बंद सरकार

तसंही या सरकारचं नाव बंद सराकर आहे. या सरकारने आल्यापासून योजना, अनुदानं बंद केल्या. कोरोना काळात महाराष्ट्र बंद केला. आता कुठे छोटे दुकानदार आणि व्यापाऱ्यांचं गाडं रुळावर येत असताना सरकारने बंद पुकारला. ईस्टर्न एक्सप्रेसवर दहा लोकांनी जाळपोळ केली. त्यावेळी पोलीस बघ्याची भूमिका घेत होते. धमक्या देऊन, दमदाटी करून बंद पुकारला जात आहे, असं ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

दुकाने बंद करण्यासाठी सेना आमदार वैभव नाईकांचा व्यापारी दुकानदारांवर दबाव, Video व्हायरल

Maharashtra bandh live updates | काँग्रेसची राजभवनाकडे कूच, आम्ही काँग्रेसवाले, शांततेत आंदोलन करु : नाना पटोले

शेतकऱ्यांनीही चार जणांना ठेचून मारलं, कारमध्ये मंत्र्यांचा मुलगा असता तर त्यालाही मारलं असतं : चंद्रकांत पाटील

(devendra fadnavis reaction on lakhimpur kheri violence case)

Non Stop LIVE Update
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा
तर युतीतून बाहेर पडू पण उमेदवार मागे नाही, बच्चू कडू यांचा थेट इशारा.
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक
हर्षवर्धन यांची नाराजी दूर होणार का? फडणवीसांच्या सागर बंगल्यावर बैठक.
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा
गैरव्यवहाराच्या आरोपात अजितदादांनंतर प्रफुल्ल पटेलांनाही दिलासा.
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.