AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maratha Reservation | राज्यात 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, किती गुन्हे दाखल, किती जणांना अटक? पोलीस महासंचालकांकडून महत्त्वाची माहिती

मराठा कार्यकर्ते मराठा आरक्षणासाठी आक्रमक झाले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये आंदोलनाला हिंसेचं वळण लागलं आहे. मराठा आंदोलकांकडून काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. या घटनांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला पोलिसांचं सहकार्य असणार आहे. पण कायद्याचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होईल, असं राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितलं आहे.

Maratha Reservation | राज्यात 3 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद, किती गुन्हे दाखल, किती जणांना अटक? पोलीस महासंचालकांकडून महत्त्वाची माहिती
| Updated on: Nov 01, 2023 | 5:44 PM
Share

मुंबई | 1 नोव्हेंबर 2023 : मराठा आरक्षणासाठी राज्यातील काही भागांमध्ये वातावरण तापलं आहे. काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलं. बीड जिल्ह्यात तर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्यालाच आंदोलकांनी आग लावली. तर माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आंदोलकांनी आग लावली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याच्या परिसरातही जाळपोळ करण्यात आली. त्यांच्या गाडीला आग लावण्यात आली. या घटनेनंतर बीड जिल्ह्यात संचारबंदी लावण्यात आली. या संचारबंदीत आज सकाळपासून शिथिलता देण्यात आलीय. पण जमावबंदी लागू आहे. मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर पोलिसांकडून काय-काय कारवाई करण्यात आली याबाबत पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली.

“राज्यात मराठा आरक्षणासाठी आंदोलनं झाली आहेत. काही ठिकाणी आंदोलनं शांततेत पार पडली आहेत. तर काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागलेलं आहे. महाराष्ट्रात आंदोलकांकडून काही ठिकाणी कायद्याचं उल्लंघन करण्यात आलंय. तर काही ठिकाणी जाळपोळच्या घटनादेखील घडल्या आहेत. अशा ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तसेच आरोपींना अटक देखील केलीय”, असं पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितलं.

“आतापर्यंत संभाजीनगर परिक्षेत्रात 29 ते 31 नोव्हेंबर तारखांच्या दरम्यान घडलेल्या घटनांच्या अनुषंगाने 54 गुन्हे दाखल आहेत. तर 106 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी बीड जिल्ह्यात 20 गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील 7 गुन्हे हे कलम 306 अंतर्गत दाखल करण्यात आले आहेत”, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.

‘या’ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद

“बीड शहरात सध्या जमावबंदीचे आदेश आहेत. तसेच बीड, संभाजीनगर ग्रामीण आणि जालना जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद आहे. महाराष्ट्रात 24 ते 31 नोव्हेंबरच्या दरम्यान एकूण 141 गुन्हे दाखल झाले आहेत आणि 168 आरोपींना अटक केली आहे. तर 146 आरोपींना कलम 41 नुसार नोटीस देण्यात आली आहे”, असं रजनीश शेठ यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात 12 कोटी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान

“संपूर्ण महाराष्ट्रात अंदाजे 12 कोटी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालंय. ज्या घटकांना अतिरिक्त मनुष्यबळाची आवश्यकता आहे त्यांना अतिरिक्त मनुष्यबळ दिलेलं आहे. आतापर्यंत 17 एसआरपीएफच्या कंपनी आम्ही वेगवेगळ्या घटनांका दिले आहेत. तसेच रॅपिड अॅक्शन फोर्सची कंपनी बीड जिल्ह्यात दाखल झालीय. सात हजार होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत”, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.

“कायद्याचं उल्लंघन करणारे, सार्वजनिक मालेमत्तेच नुकसान करणारे, तसेच जाळपोळ करणाऱ्या असामाजिक तत्व यांच्यावर पोलीस कडक कारवाई करेल. तसेच शांततेत सुरु असलेल्या आंदोलनाला पोलीस सहकार्य करतील. पोलिसांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणारे आणि सार्वजनिक मालमत्तेची जाळपोळ करणाऱ्या लोकांवर पोलिसांनी आवश्यक ती कारवाई करावी”, असं रजनीश शेठ म्हणाले.

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.