AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत कोट्यवधींच घर; तरी मुंडेंना शासकीय बंगल्याचा मोह आवरेना! ताबा न सोडण्यावर केलेला अजब दावा

धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील सरपंच हत्या प्रकरणी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. राज्याच्या शासकीय बंगल्यावरून त्यांना ४२ लाखांचा दंड ठोठावला आहे. मात्र, त्यांच्याकडे मुंबईत १६.५ कोटी रुपयांना खरेदी केलेले २१५१ चौरस फुटांचे घर असल्याचे समोर आले आहे. हे घर खरेदी केले असतानाही ते शासकीय निवासस्थान रिकामे करण्यास तयार नाहीत, यामुळे हा वाद निर्माण झाला आहे.

मुंबईत कोट्यवधींच घर; तरी मुंडेंना शासकीय बंगल्याचा मोह आवरेना! ताबा न सोडण्यावर केलेला अजब दावा
dhananjay munde mumbai home
| Updated on: Aug 13, 2025 | 11:50 AM
Share

बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी तत्कालीन अन्न आणि नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा देऊन अनेक महिने उलटले असले तरी धनंजय मुंडे यांनी अजूनही मलबार हिलमधील सातपुडा हा शासकीय बंगला रिकामा केलेला नाही. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने त्यांना आतापर्यंत तब्बल ४२ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याप्रकरणी धनंजय मुंडे यांनी आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे. तसेच मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी मुदतवाढ मागितल्याचे म्हटले होते. आता याबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे.

धनंजय मुंडे यांच्याकडे मुंबईत स्वतःचे आलिशान घर असल्याचा प्रकार समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून ही माहिती समोर आली आहे. धनंजय मुंडे यांच्या नावावर गिरगाव चौपाटीतील एन. एस. पाटकर मार्गावरील वीरभवन इमारतीत घर आहे. डिसेंबर २०२३ मध्ये मुंडे आणि त्यांच्या पत्नीने हे घर १६ कोटी ५० लाख रुपयांना खरेदी केले होते. धनंजय मुंडे यांचे मुंबईतील घर वीरभवन इमारतीत 9 व्या मजल्यावर आहे. 902 असा या घराचा क्रमांक आहे.

धनंजय मुंडेंचे हे घर तब्बल 2 हजार 151 चौरस फुटांचे आहे. मात्र मंत्रिपद गेल्यानंतर देखील सरकारी निवासस्थानात राहत आहेत. धनंजय मुंडे यांनी स्वतः यासाठी 10 कोटी रुपये खर्च केला होता. या घरात सध्या कोणीही राहत नाही. ते घर खरेदी केल्यापासूनच बंद आहे, अशी माहिती विधानसभा निवडणुकीत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून समोर आली आहे.

नेमकं प्रकरण काय?

महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत आल्यावर धनंजय मुंडे यांना सातपुडा बंगला वाटप करण्यात आला होता. मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर १५ दिवसांच्या आत सरकारी बंगला रिकामा करणे बंधनकारक असते. धनंजय मुंडे यांनी ४ मार्च रोजी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यानुसार त्यांनी २० मार्चपर्यंत बंगला सोडणे अपेक्षित होते. पण त्यांनी मुदतवाढ मागून अद्याप बंगला रिकामा केलेला नाही. सातपुडा बंगल्याचे क्षेत्रफळ ४ हजार ६६७ चौ. फूट आहे. नियमांनुसार, मंत्र्यांनी १५ दिवसांत बंगला सोडला नाही, तर त्यांना प्रति चौ. फूट २०० रुपये दंड आकारला जातो. यामुळे, मुंडे यांना महिन्याला ९ लाख ३३ हजार रुपये दंड लागत असून आता ही रक्कम ४२ लाखांच्या घरात पोहोचली आहे.

याबद्दल धनंजय मुंडे यांनी विचारले असता त्यांनी आजारपणामुळे मला मुंबईत राहणे आवश्यक आहे. माझ्या मुलीच्या शाळेचाही प्रश्न आहे. त्यामुळे निवासस्थान रिक्त करण्यासाठी मी मुदतवाढ मागितली आहे. याआधी अनेक माजी मंत्र्यांना अशा प्रकारे मुदतवाढ देण्यात आली आहे” असे सांगितले होते. तर दुसरीकडे मंत्री छगन भुजबळ यांना सातपुडा बंगला देण्याचा शासकीय आदेश २३ मे रोजी काढण्यात आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.