AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharashiv : राज्याचा बिहार होतोय का? पवनचक्कीसाठी जमीन बळकवण्याचा प्रयत्न, शेतकर्‍याला बेदम मारहाण, पोलीसांचे गुंडांना अभय?

Dharashiv Windmills Farmer : राज्यात मराठवाड्यातील काही जिल्ह्यात अराजकतेचे राज्य आहे का? असा प्रश्न पडावा अशी परस्थिती निर्माण झाली आहे. परभणी, बीडनंतर आता धाराशिवमध्ये पवनचक्की उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी मारहाण करण्यात येत असल्याचे समोर येत आहे.

Dharashiv : राज्याचा बिहार होतोय का? पवनचक्कीसाठी जमीन बळकवण्याचा प्रयत्न, शेतकर्‍याला बेदम मारहाण, पोलीसांचे गुंडांना अभय?
शेतकऱ्याला गुंडांची मारहाण, पोलीस गप्प का?
| Updated on: Dec 20, 2024 | 2:24 PM
Share

राज्याचा बिहार होतोय का? असा सवाल विरोधक सरकारला विचारत आहेत. मराठवाड्यात या महिन्यात घडलेल्या गोष्टीत पोलीसच गुन्हेगारांना साथ तर देत नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. परभणी, बीड नंतर आता धाराशिव जिल्ह्यात गुंडांची दहशत समोर येत आहे. या तीनही जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का? असा रोकडा सवाल विरोधकांनी विचारला आहे. धाराशिवमध्ये पवनचक्की उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी मारहाण करण्यात येत असल्याचे समोर येत आहे. विशेष म्हणजे पोलीसांकडे धाव घेतल्यावर पण ते बघ्याची भूमिका वठवत असल्याने त्यांच्याबद्दल रोष व्यक्त होत आहे.

काय आहे प्रकरण?

जे एस डब्ल्यू या पवनचक्की कंपनीला तुळजापूर तालुक्यातील बारूळ गावातील ठोंबरे कुटुंबियांनी 20 गुंठे जमीन भाडे तत्त्वावर दिली आहे. मात्र या कंपनीकडून शेतकर्‍यांना दमदाटी करण्यात आली आहे. ठोंबरे यांची 22 गुंठे जमीन न घेता 35 गुंठे जमीन बळकवण्यात आली, असा आरोप ठोंबरे कुटुंबियांनी केला आहे. करारापेक्षा जास्त जमीन देण्यास शेतकऱ्याने विरोध केल्यावर जे एस डब्ल्यू या कंपनीच्या ठेकेदाराने भाडोत्री गुंडाकडून जमीन मालक सचिन ठोंबरे यांना बेदम मारहाण केली.

या जीवघेण्या मारहाणीत शेतकरी सचिन ठोंबरे याच्या डोक्यात लोखंडी रॉड लागला. या मारहाणीत तो रक्त बंबाळ झाला. पण पोलिसांनी त्याची साधी तक्रार सुद्धा घेतली नसल्याचा आरोप सचिन ठोंबरे यांनी केला आहे.

कारवाई सोडा पोलीसच मूग गिळून

शेतकरी सचिन ठोंबरे याला मारहाण केल्यानंतर त्याच्या आई-वडीलांना पवनचक्कीच्या गुंडांनी धक्का बुक्की केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या शेतकर्‍यांनी तुळजापूर पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पण तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. सचिन ठोंबरे यांनी थेट धाराशिवच्या जिल्हा पोलीस अधीक्षकाकडे तक्रार केली. मात्र गेली 21 तारखेपासून आजपर्यंत या तक्रारीची दखल घेण्यात आली नसल्याचे शेतकर्‍याकडून दावा करण्यात येत आहे.

हा घडलेला प्रकार दाबण्यासाठी पवनचक्कीच्या गुप्तेदाराकडून शेतकरी सचिन ठोंबरे याला वीस गुंठ्यापेक्षा अधिक जमिनीचा मोबदला म्हणून 75 हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. पण त्यात पैसेच नव्हते. अशी फसवणूक सुरू असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

बीड जिल्ह्याच्या मस्साजोग येथील देशमुख कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत असतानाच धाराशिवमधील बारुळ गावातील ठोंबरे कुटुंबिय पवनचक्कीच्या गुंडांच्या दहशतीखाली वावरत असल्याच समोर आले आहे. एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामधील पवनचक्कीच्या गुंडांची दहशत कधी संपणार असा प्रश्न जिल्ह्यातील शेतकर्‍यांना पडला आहे.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.