धारावीत तब्बल 31000 जण होम क्वारंटाईन, आठ दिवसात 412 पॉझिटिव्ह, दिवसभरात चौघांचा मृत्यू

धारावीतील करोनाबाधितांची संख्या 1 हजार 145 वर पोहोचली आहे. तर तब्बल 31000 जण होम क्वारंटानईमध्ये (Dharavi Corona Patient Increasing) आहेत. 

धारावीत तब्बल 31000 जण होम क्वारंटाईन, आठ दिवसात 412 पॉझिटिव्ह, दिवसभरात चौघांचा मृत्यू
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 8:56 PM

मुंबई : राज्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा सातत्याने (Dharavi Corona Patient Increasing) वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहेत. पण रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. धारावी हा मुंबईतील सर्वात मोठा हॉटस्पॉर्ट बनला आहे.

मुंबईतील धारावीत आज 4 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धारावीत आज 84 नव्या रुग्णांची (Dharavi Corona Patient Increasing) भर पडली आहे. धारावीत रुग्णसंख्या 1 हजार 145 वर पोहोचली आहे. तर एकूण 53 मृत्यू झाले आहेत. विशेष म्हणजे तब्बल 31000 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत.

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावी आहे. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर धारावीत जर कोरोनाबाधित रुग्ण आढळला तर ते आवरण कठीण होईल, अशी भीती व्यक्त केली होती. मात्र आता तसेच होताना दिसत आहे.

धारावीसारख्या झोपडपट्टी कोरोनाचा संसर्ग हा वाढत आहे. यासाठी प्रशासन अनेक उपाय योज़ना करत आहे. पण मात्र अगदी दाटीवाटीच्या या झोपडपट्टीत कोरोना वेगाने पसरत आहे.

धारावीतील करोनाबाधितांची संख्या 1 हजार 145 वर पोहोचली आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या तब्बल 37 हजारांहून अधिक धारावीकरांना अलगीकरणात ठेवण्याची वेळ पालिकेवर ओढवली आहे.

धारावीतील रुग्ण संख्या वाढतीच

तारीख – रुग्ण

7 मे – 50 रुग्ण 8 मे – 25 रुग्ण 9 मे – 25 रुग्ण 10 मे – 26 रुग्ण 11 मे – 57 रुग्ण 12 मे – 46 रुग्ण 13 मे – 66 रुग्ण 14 मे-  33 रुग्ण 15 मे – 84 रुग्ण

धारावीतील करोनाबाधितांच्या संपर्कातील अतिजोखमीच्या गटातील सुमारे 6 हजार 496, तर कमी जोखमीच्या गटातील सुमारे 30 हजार 750 जणांचा पालिकेने शोध घेतला आहे.

कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्यामुळे अति आणि कमी जोखमीच्या गटातील नागरिकांना करोनाची बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेने या सर्वाना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी 31 हजार 725 जणांना घरातच विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आली आहे. तर पालिकेने व्यवस्था केलेल्या संस्थात्मक विलगीकरण कक्षामध्ये 5 हजार 857 जणांना ठेवण्यात आले आहे.

मात्र घरीच विलगीकरणात राहण्याची सूचना करण्यात आलेल्या 31 हजार 725 जणांवर लक्ष ठेवणे यंत्रणेला अशक्य आहे.

धारावी विलगीकरण कक्ष

1. राजीव गांधी स्पोर्टस्

2. धारावी पालिका शाळा

3. मनोहर जोशी विद्यालय

4. माहीम नेचर पार्क

5. रुपारेल कॉलेज हॉस्टेल

“मुंबईत कोरोना आकडे वाढत आहेत. पण काही दिवसात हे चित्र बदलेल. धारावीबाबत विविध उपाययोजना करत आहोत. धारावी ही दाटीवाटीची झोपडपट्टी आहेत, त्यामुळे या ठिकाणी हे कमी होण्यास वेळ लागेल,” अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी (Dharavi Corona Patient Increasing) दिली.

संबंधित बातम्या : 

मुंबई ते पारनेर लपून प्रवास, मृत्यूनंतर जावयाचा ‘कोरोना’ उघड, दोनशे जण क्वारंटाईन

Aurangabad Corona | औरंगाबादेत ‘कोरोना’चा कहर, शहराच्या 25 भागात 74 नवे रुग्ण

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.