AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मोठा राडा, शिंदे-ठाकरे गट आमनेसामने

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर आज मोठा राडा झाला. शिवसेनेचे दोन्ही गट आमनेसामने आले. बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिवस आहे. त्यानिमित्ताने शिवतीर्थावर बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर श्रद्धांजलीचा कार्यक्रम शिंदे गटाकडून आयोजिक करण्यात आला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवतीर्थावर आले. त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. पण ते स्मृतीस्थळावरुन निघून गेल्यानंतर शिंदे-ठाकरे गटाचे कार्यकर्ते आमनेसामने आले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर मोठा राडा, शिंदे-ठाकरे गट आमनेसामने
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Nov 16, 2023 | 9:26 PM
Share

मुंबई | 16 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देवून आदरांजली वाहिली. यावेळी शिंदे गटाचे अनेक नेते, आमदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते तिथे आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला वंदन करुन गेल्यानंतर शिवाजी पार्क मैदानावर मोठा वाद निर्माण झाला. एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावरुन गेल्यानंतर ठाकरे गटाचे कार्यकर्ते तिथे दाखल झाले. विशेष म्हणजे ठाकरे गटाचे नेते अनिल परब आणि अनिल देसाई यांच्या नेतृत्वात हे कार्यकर्ते तिथे आले. यावेळी दोन्ही गट आमनेसामने आले. दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला.

“आमच्यासाठी उद्या फार महत्त्वाचा दिवस आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतीदिन आहे. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि देशासाठी संपूर्ण आयुष्य वेचलं त्यांचा उद्या स्मृतीदिन आहे. तो स्मृतीदिन आम्ही शांततेने श्रद्धांजली वाहण्यासाठी आहे. बाकीचे तमाशे करण्याच्या प्रयत्नात आहेत. कुणीही इथे विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर आम्ही विघ्न येऊ देणार नाहीत. तो दिवस नाही. संपूर्ण जग बघतंय”, अशी भूमिका अनिल देसाई यांनी मांडली.

“त्यांचं झालंय ना आता, त्यांना आता निघू द्या. आम्ही शांततेचं आवाहन केलं आहे. ज्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं नेतृत्व माहिती आहे, ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार माहिती आहेत ते कुणीही इथे अनर्थ करणार नाहीत”, असंही अनिल देसाई यावेळी म्हणाले. कोण कुणाला डिवचत नाही, असंही देसाई यावेळी म्हणाले.

‘ही जागा त्यांच्या बापाची नाही’, नरेश म्हस्के आक्रमक

शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “त्यांनी हिंदुत्वाचे विचार सोडून दिले आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर ते अशा पद्धतीचे वागणूक करतात, त्यांनी महिलांना धक्काबुक्की केली आहे. हे निषेधार्ह आहे”, असं नरेश म्हस्के म्हणाले. “आम्ही स्वतंत्र भारतात राहतो. ही जागा त्यांच्या बापाची नाही”, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली. “तुम्ही त्यांनाही बाहेर काढा. ही जागा कुणाच्या बापाची नाही”, असं नरेश म्हस्के म्हणाले.

‘कोणाचे दलाल आहेत, शरद पवारांचे दलाल आहेत?’

आमदार सदा सरवरणकर यांनी यावेळी प्रतिक्रिया दिली. “बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं कुणी शुद्धीकरण करणार असेल तर हे कोण आहेत, कोणाचे दलाल आहेत, शरद पवारांचे दलाल आहेत? शिवसेनाप्रमुखांनी हिंदुत्वाची ज्योत तेवत ठेवण्याचं काम केलं. पण ती ज्योत हे विझवण्याचं काम करत आहेत आणि इथे कशासाठी येत आहेत? आमच्या बघिणींवर त्यांनी हात टाकले आहेत. हे त्यांना शोभतं का?”, असा सवाल आमदार सदा सरवणकर यांनी केला.

‘आम्ही खरी शिवसेना’, शीतल म्हात्रे आक्रमक

“शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनीदेखील ठाकरे गटावर निशाणा साधला. आम्ही शिंदे गट नाही तर आम्ही शिवसेना आहोत. आम्ही खरी शिवसेना आहोत. आमच्याकडे धनुष्यबाण आहे. हे कोण, त्यांच्या पक्षाच्या प्रमुखांना विचारा. त्यांची निशाणी काय ते विचारा. आम्हाला सर्व महिलांना धक्काबुक्की केली. आम्हाला मारण्यासाठी रॉड काढले, उद्या गोंधळ नको म्हणून मुख्यमंत्र्यांनी आज याचचा निर्णय घेतला. यांना आज इथे यायची गरज काय होती? हे एवढ्या मोठ्या संख्येने का आले? स्मृतीस्थळाचं पावित्र्य तुम्ही घालवलं आहे. त्यांना लाज वाटलं पाहिजे. तुम्ही महिलांना धक्काबुक्की करता. त्यांच्याकडे हरवण्यासाठी काही नाही”, असा घणाघात शीतल म्हात्रे यांनी केला.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी