AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

DMart: महिन्याला तब्बल 28.5 लाख रुपये भाडं; DMart फेम राधाकिशन दमानींच्या कंपनीचा मुंबईत सर्वांत महागडा व्यवहार

राधाकिशन दमानी यांच्या कंपनीने वरळीतील 'थ्री सिक्स्टी वेस्ट'मधील आलिशान फ्लॅट तीन वर्षांसाठी भाड्याने दिलं आहे. मुंबईतील हा अत्यंत महागडा व्यवहार मानला जात आहे. जाणून घ्या सविस्तर माहिती..

DMart: महिन्याला तब्बल 28.5 लाख रुपये भाडं; DMart फेम राधाकिशन दमानींच्या कंपनीचा मुंबईत सर्वांत महागडा व्यवहार
डी-मार्टचे संस्थापक राधिकशन दमानी Image Credit source: Instagram
| Updated on: Oct 04, 2026 | 8:25 AM
Share

मुंबईतील अल्ट्रा-लक्झरी रिअल इस्टेट मार्केट पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. ‘डी-मार्ट’चे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्याशी संबंधित कंपनीने मुंबईतील वरळी इथलं आलिशान अपार्टमेंट लीजवर दिलं आहे. हा व्यवहार मुंबईतील सर्वाधिक महागड्या रेंटल डीलपैकी एक मानला जात आहे. मालमत्तेच्या नोंदणी कागदपत्रांच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. तब्बल 28.5 लाख रुपये मासिक भाड्याने हे अपार्टमेंट लीजवर दिल्याची माहिती समोर येत आहे. हे अपार्टमेंट वरळीतील ‘थ्री सिक्स्टी वेस्ट’ या लक्झरी प्रोजेक्टमध्ये आहे. डॉ. अॅनी बेझंट रोडवरील या प्रकल्पातील टॉवर बीच्या 19व्या मजल्यावर हे घर आहे. तब्बल 6,831 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या अपार्टमेंटसोबत चार कार पार्किंगची सुविधाही देण्यात आली आहे.

भाड्याची रक्कम थक्क करणारी

या घराचा लीज व्यवहार 28 सप्टेंबर 2026 रोजी नोंदवण्यात आला. कराराचा कालावधी 36 महिने म्हणजेच तीन वर्षांचा आहे. या काळात सुरुवातीचं मासिक भाडं 28.5 लाख रुपये असेल. म्हणजेच केवळ तीन वर्षांच्या भाड्याची रक्कम 10 कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. या व्यवहारातील आणखी एक लक्षवेधी बाब म्हणजे तब्बल 1.71 कोटी रुपयांचा सिक्युरिटी डिपॉझिट. या आलिशान अपार्टमेंटसाठी भाडेकरू कंपनीने ही रक्कम जमा केली आहे. अपार्टमेंटचा भाडेकरू म्हणून आयव्हीएल धनसेरी पेट्रोकेम इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड (IVL Dhunseri Petrochem Industries Private Limited) कंपनीचं नाव नोंदवण्यात आलं आहे.

प्रीमियम घरांना मागणी

मुंबईतील सर्वसामान्य घरांच्या तुलनेत ही रक्कम प्रचंड मोठी असली, तरी वरळीतील अल्ट्रा-लक्झरी रिअल इस्टेटमध्ये अशा व्यवहारांचं प्रमाण वाढताना दिसत आहे. विशेषतः कॉर्पोरेट कंपन्या, उद्योगपती आणि अतिश्रीमंत ग्राहकांकडून अशा प्रीमियम घरांना मागणी आहे. ‘थ्री सिक्स्टी वेस्ट’ हा मुंबईतील प्रसिद्ध लक्झरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आहे. वरळीच्या प्राइम लोकेशनमुळे या परिसरातील घरांच्या किमती आणि भाडे दोन्ही मोठ्या प्रमाणात आहेत. याच प्रोजेक्टमध्ये यापूर्वीही कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. सप्टेंबर 2026 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने याच प्रोजेक्टमधील डुप्लेक्ससाठी 75.1 कोटी रुपयांचा व्यवहार केल्याची नोंद आहे.

विशेष म्हणजे, 2026 मध्ये मुंबईच्या लक्झरी रिअल इस्टेटमध्ये वरळी हे प्रमुख केंद्र ठरलं आहे. 5 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांच्या व्यवहारांमध्ये वरळीने आघाडी घेतली असून, लक्झरी रेंटल मार्केटमध्येही या परिसराचा मोठा वाटा आहे.

Follow Us
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीसांसमोरच...
विक्रम शिंगाडेंवर विनयभंगाचा गुन्हा; अभयसिंह जगतापांचे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन!
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसान
नुसताच पाऊस कमी नाही, पिकंही गेली! अहिल्यानगरच्या 14 तालुक्यांत नुकसानीचे पंचनामे सुरू
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
विधान परिषदेच्या जागेवरून मविआत तोडगा नाही, पुन्हा बैठक होणार
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर