Ajit Pawar: भाजपच्या कुबड्या नकोच, अजितदादांचा स्वबळाचा नारा, महायुतीची डोकेदुखी वाढणार?

Ajit Pawar NCP: महापालिका निवडणुकीपूर्वी राजकीय गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे. महायुतीत असूनही अजित पवारांची राष्ट्रवादी राज्यातील अनेक महापालिका निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे महायुतीमध्येच पहिला मिठाचा खडा पडल्याची चर्चा सुरू आहे.

Ajit Pawar: भाजपच्या कुबड्या नकोच, अजितदादांचा स्वबळाचा नारा, महायुतीची डोकेदुखी वाढणार?
अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष
| Edited By: | Updated on: Dec 26, 2025 | 10:11 AM

Municipal Corporation Election: राजकीय गोटातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. भाजपसह शिंदेसेनेशी सूर न जुळल्याने महापालिका निवडणुकीत दादा गटाने एकला चलो रे चा निर्णय घेतल्याची माहिती समोर येत आहे. नैसर्गिक युतीचा घटक नसल्याने अजितदादांच्या राष्ट्रवादी एकटी पडल्याचे चित्र आहे.अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस अनेक महापालिका युती सोबत न जाता स्वतंत्र निवडणूक लढवण्याचे जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महायुतीविरुद्ध अजितदादांची राष्ट्रवादी असा सामना रंगण्याची शक्यता आहे. तर काही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांना दादांच्या राष्ट्रवादीचे बळ मिळणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यातील या महापालिकेत दादांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

अनेक महापालिकेत दादांचा स्वबळाचा नारा

मुंबई,ठाणे,कल्याण-डोंबिवली,वसई विरार,मिरा भाईंदर,अमरावती,पुणे पिंपरी, नाशिक, सोलापूर महापालिका एनसीपी अजित पवार पार्टी स्वतंत्र निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेना भाजपा एकत्र लढत असल्याने अनेक ठिकाणी एनसीपीची इच्छा असून ही जागा वाटप स्थान नसल्याने स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा निर्णय अजितदादांच्या राष्ट्रवादीने घेतला आहे. त्यामुळे आता अनेक महापालिकांमध्ये महायुतीमध्ये सुद्धा टक्कर दिसू शकते. काही ठिकाणी हा सामना अधिक चुरशीचा होऊ शकतो.

नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकीत अजितदादांच्या राष्ट्रवादीने करिष्मा करुन दाखवला आहे. राजकीय विश्लेषकांना सुद्धा दादांच्या राष्ट्रवादीच्या कामगिरीची दखल घ्यावी लागली आहे. मराठवाड्यात तर शिंदे सेनेचा बालेकिल्ला असतानाही राष्ट्रवादीने मोठी धडक मारली आहे. भाजपनंतर राष्ट्रवादी क्रमांक दोनचा पक्ष ठरला आहे. त्यामुळे महापालिकेतही स्थानिक नेत्यांनी कुणाशी आघाडी आणि युती नको असा सूर आळवला आहे. तर दुसरीकडे भाजप आणि शिंदेसेनेकडून सन्मानजनक जागा मिळण्याची चिन्ह न दिसल्याने आता दादांची राष्ट्रवादी ताकद दाखवण्याची शक्यता आहे.

अंतिम निर्णय लवकरच

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार सुनिल तटकरे यांच्या सोबत चर्चा नंतरच अजित पवार स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजते. तरएनसीपी अजित पवार यांनी मनपात स्थानिक पातळींवर कोणासोबत जावे याचा निर्णय घ्यायचा पण शक्यतो काँग्रेस सोडून मित्र पक्ष करावे असा भाजपा नेत्यांचे मत असल्याचे समजते. त्यामुळे अनेक महापालिकेत आता राष्ट्रवादीला समविचारी पक्षांची मोट बांधावी लागणार आहे. मुंबई महापालिकेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे महाविकास आघाडीसोबत सुर जुळले नाही तर पुणे, पिंपरी पाठापोठ राज्यातील इतर महापालिकेत कदाचित दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसण्याची एक शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

पनवेल महापालिका निवडणुक महाविकास आघाडी एकत्र 

पनवेल महापालिकेची निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढवणार स्पष्ट झालय.. या निवडणुकीच्या तिकीट वाटपाचे तिढा देखील सुटला आहे. विशेष म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा एकही नगरसेवक नसताना देखील महाविकास आघाडीच्या इतर पक्षांनी शिवसेनेला जागा सोडल्या आहेत. तसेच भाजपच्या विरोधामध्ये सर्व महाविकास आघाडीतले मित्रपक्ष एकत्र येत ही निवडणूक लढवली जाणार आहेत. शेतकरी कामगार पक्ष 40 इतक्या जागा लढवणार आहे. इतर जागा मित्र पक्षाला देण्यात येणार आहेत. एकूणच पनवेल महापालिकेच्या निवडणुकीमध्ये 78 जागा आहेत, अशी माहिती शेकापचे माजी आमदार बाळाराम पाटील यांनी दिली.