डॉक्टर्स व नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती

मुंबईत प्रथमच लोकसभा निवडणूकांच्या कामासाठी केईएम, नायर सारख्या बड्या मुंबई महानगर पालीका रुग्णालयातील डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटीला जुंपण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता डॉक्टर्स, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्यात येणार आहे.

डॉक्टर्स व नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टरांची इलेक्शन ड्युटी अखेर रद्द
Follow us
| Updated on: Mar 28, 2024 | 9:41 AM

मुंबईत प्रथमच लोकसभा निवडणूकांच्या कामासाठी केईएम, नायर सारख्या बड्या मुंबई महानगर पालीका रुग्णालयातील डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटीला जुंपण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले. त्यामुळे रुग्णसेवेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मात्र आता डॉक्टर्स, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्यात येणार आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी ही माहिती दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी सर्वच सज्ज झाले आहेत. राजकीय पक्ष, कार्यकर्ते तर कंबर कसून तयारी करत आहेतच, पण त्यासोबत शिक्षक, महापालिकेचे कर्मचारी यांनाही या कामाला लावण्यात येते. त्यातच निवडणूक आयोगाने मुंबईत प्रथमच डॉक्टरांना निवडणूकीच्या कामाला जुंपण्याचा निर्णय घेतला. यंदा निवडणूकीच्या कामांसाठी डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटी लावण्याचा निर्णय जाहीर झाला होता.

मात्र त्यामुळे सरकारी रुग्णालयातील रुग्णसेवेवर याचा परिणाम होण्याची, ताण येणार होता. त्यामुळे आता यासंदर्भात एक नवा निर्णय घेण्यात आला असून डॉक्टर्स आणि नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द करण्यात येत आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे.

काय आहे प्रकरण ?

लोकसभा निवडणूकांचा धडाका सुरु झाला आहे. राज्यातील 48 लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. तर मुंबईतील सहा लोकसभा जागांसाठी मतदान होणार आहे. मुंबईत यंदा निवडणूकीच्या कामांसाठी डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटी लावली आहे. मुंबईतील महत्वाच्या आणि रुग्णसेवेचा सर्वाधिक भार असलेल्या केईएम, सायन, कुपर, जीटी, नायर आणि नायर डेंटल रुग्णालयातील डॉक्टरांना इलेक्शन ड्यूटी लावण्यात आली.अगदी नर्सेस पासून ते डीनपर्यंत सर्वांनाच निवडणूकीचे काम दिल्याने रुग्ण सेवेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. मुंबईतील पालिका रूग्णालयांतील सुमारे 80 टक्के स्टाफ इलेक्शन ड्युटीवर जाणार असल्याचे वृत्त समोर आले होते.

इलेक्शन ड्युटी अखेर रद्द !

मात्र आता डॉक्टर्स, नर्सेस यांना लावण्यात आलेली इलेक्शन ड्युटी रद्द करण्यात आली आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी यासंदर्भात माहिती  दिली.  ‘ बृहन्मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स, परिचारिका यांना या निवडणूकीदरम्यान सेवा बजावण्यासाठी आदेश देण्यात आल्याचे विविध वृत्तवाहिन्यांवरील बातम्यांमधून निदर्शनास आले आहे. अशा पध्दतीने वैद्यकीय सेवेतील डॉक्टर्स, नर्सेस यांना निवडणूक विषयक देण्यात आलेल्या आदेशांची माहिती घेऊन अशा अत्यावश्यक सेवेतील अधिकारी/ कर्मचारी यांचे निवडणूक विषयक कामाबाबतचे आदेश तात्काळ रद्द करण्यात येतील’ असे जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविले आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्सेस यांच्यावरील इलेक्शन ड्युटीचा भार आता उतरला असून त्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.