…मग मुख्यमंत्री ठाकरेंना नेमकं माहिती तरी काय असतं?; भाजपचा सवाल

भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती, असे राज्याच्या गृहमंत्र्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.

...मग मुख्यमंत्री ठाकरेंना नेमकं माहिती तरी काय असतं?; भाजपचा सवाल
केशव उपाध्य, मुख्य प्रवक्ते, भाजप

मुंबई : भाजप नेते किरीट सोमैय्या यांच्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती, असे राज्याच्या गृहमंत्र्यांकडून, शिवसेनेच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. राज्याचा प्रमुख असलेल्या व्यक्तीला मग नेमकं काय माहित असतं, असा सवाल भारतीय जनता पार्टीचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा प्रदेश सचिव दिव्या ढोले यावेळी उपस्थित होते. (Does the CM Uddhav Thackeray not know about important events in the state? BJP raised question)

उपाध्ये यांनी सांगितले की, किरीट सोमैय्या हे भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. सोमैय्या यांना स्थानबद्ध करण्यात आल्याच्या प्रकाराची मुख्यमंत्र्यांना माहितीच नव्हती असा खुलासा शिवसेनेच्या नेत्यांनी केला आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही मुख्यमंत्र्यांना सोमैय्या यांना रोखण्यात आल्याच्या घटनेची कल्पना नव्हती, असे स्पष्ट केले आहे. एवढ्या महत्वाच्या घटनेची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती तर मुख्यमंत्र्यांना नेमकं काय माहिती असतं असा प्रश्न सामान्य माणसाला पडला आहे.

राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांनी कळस गाठला आहे. या घटनांचीही मुख्यमंत्र्यांना माहिती नसावी. निसर्ग चक्रीवादळाची भरपाई कोकणवासीयांना मिळाली की नाही याची माहिती मुख्यमंत्र्यांना नव्हती. असे असेल तर राज्याचे सरकार चालविते तरी कोण? असा प्रश्न उपाध्ये यांनी केला. राज्यातील जनतेच्या प्रश्नांची मुख्यमंत्र्यांना माहिती नसते. मात्र स्वतः वर झालेल्या टीका टिप्पण्णीची त्यांना व्यवस्थित माहिती असते. त्यांच्यावर टीका करणाऱ्या कंगना राणावत, अर्णव गोस्वामी, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर सरकारने तातडीने कशी कारवाई केली हे उभ्या महाराष्ट्राने पहिले आहे. हीच तत्परता सामान्य माणसाच्या प्रश्नांबाबतही दाखवा, असेही उपाध्ये यांनी नमूद केले.

‘त्या’ घटनेची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करा : शेलार

किरीट सोमय्या यांना स्थानबद्ध करण्याबाबत जी घटना घडली, याची मुंबई उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी आमदार आशिष शेलार यांनी सरकारकडे केली आहे. आशिष शेलार यांनी आज भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते.

शेलार यावेळी म्हणाले की, राज्यात ‘तक्रारदार स्थानबद्ध आणि गावगुंड राज्यभर मुक्त’, अशी स्थिती निर्माण झाली असून राज्य अराजकतेकडे जात आहे. त्यामुळे पत्रकार, संपादक, बुद्धिजीवी वर्ग, सामान्य नागरिकांनी आता बोललं पाहिजे. विरोधीपक्ष म्हणून आम्ही आमचे काम करीत आहोतच, पण सामन्यांनीदेखील आवाज उठवायला हवा.

कोल्हापूर जिल्ह्यात हसन मुश्रीफ यांच्या आर्थिक गैरव्यवहाराबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या जात होते. त्यावेळी सोमय्या यांना कोल्हापूरला जाण्यापासून पोलीसांकडून रोखण्यात आले. किरीट सोमय्या यांनी आधीच सांगितलं की, आपण अमूक एका ठिकाणी तक्रार नोंदवण्यासाठी जाणार आहे. त्यावेळी काल मुंबईत शंभर सव्वाशे पोलीस नीलम नगरला घेराव घालून होते. हा पोलिसांचा गैरवावर नाही का? असा सवालही शेलारांनी केला आहे. एका नागरिकाला, एका नेत्याला, एका माजी खासदाराला खोटी आणि बोगस नोटीस दाखवली जात होती. ज्या जिल्ह्यातून ही नोटीस काढली त्या पोलिसांनी मुंबईतील लोकल पोलिसांकडे एन्ट्री केली होती का? सोमय्यांना नोटीस दाखवण्याची पद्धत आणि खऱ्या नोटीसला उशीर का झाला? अशी प्रश्नांची सरबत्तीच शेलार यांनी यावेळी केली.

इतर बातम्या

उद्धवजींनी पत्र द्यावं, लगेच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु करतो : रावसाहेब दानवे

गुजरातमध्ये बलात्काराच्या रोज 3 घटना, मग तिथे एक महिन्यांचे विशेष अधिवेशन बोलवावे लागेल; मुख्यमंत्र्यांचा घणाघात

तुम्ही देवभूमीचे सुपुत्र, पण उत्तराखंडात महिला अत्याचारांवरील घटनांत दीडशे टक्क्याने वाढ; मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांना दाखवला आरसा

(Does the CM Uddhav Thackeray not know about important events in the state? BJP raised question)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI