डोंगरीतील कोळी महिला ‘कृष्णकुंज’वर, परप्रांतीय मासेविक्रेत्यांना हटवण्यासाठी राज ठाकरेंना साकडे

डोंगरी मासळी बाजाराबाहेर बेकायदा मासेविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण सातत्याने वाढत आहे.

डोंगरीतील कोळी महिला 'कृष्णकुंज'वर, परप्रांतीय मासेविक्रेत्यांना हटवण्यासाठी राज ठाकरेंना साकडे
Follow us
| Updated on: Oct 05, 2020 | 1:19 PM

मुंबई : डोंगरी येथील कोळी महिला आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंज येथे आल्या होत्या. डोंगरी मार्केटमध्ये बेकायदा मासेविक्रेत्यांनी अतिक्रमण केलं असून हे अतिक्रम हटवण्याची मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्यापुढे यावेळी मांडली. (Dongri koli women meet Raj Thackeray)

कोणतीही वेळ न घेता या महिला राज ठाकरे यांना भेटण्यासाठी आल्या होत्या. परंतु तरीदेखील राज ठाकरे त्यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजबाहेर आले. यावेळी राज यांनी कोळी महिलांच्या शिष्टमंडळाची भेट घेतली. त्यांची मागणी ऐकूण घेतली. या कोळी भगिनींची समस्या महत्त्वाची असल्याने त्या वेळ घेऊन आल्या नसल्या तरी राज यांनी त्यांची भेट घेतली.

डोंगरी मासळी बाजाराबाहेर (मच्छीमार्केट) बेकायदा मासेविक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. हे अतिक्रमण सातत्याने वाढत आहे. अतिक्रमण करणारे मासेविक्रेते हे परप्रांतीय असून ते बेकायदा मासेविक्री करत आहेत. परप्रांतीय मासे विक्रेत्यांमुळे कोळी महिलांचा व्यवसाय मंदावला आहे. त्यामुळे या अनधिकृत मासेविक्री करणाऱ्यांना त्या ठिकाणावरुन हटवण्यात यावे, अशी मागणी या महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे केली. यावेळी राज ठाकरे यांनी कोळी महिलांना त्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले.

दरम्यान गेल्या आठवड्यात मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी त्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन राज ठाकरेंना दिले. राज ठाकरेंनी याबाबत लवकरच आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबत चर्चा करू आणि विषय मार्गी लावू असं आश्वासन दिलं.

संबंधित बातम्या

Raj Thackeray | हाथरस अत्याचार प्रकरणावरुन राज ठाकरे आक्रमक, योगी सरकारला सवाल

Mahatma Gandhi Jayanti | गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण अंगिकारलं, तर अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील : राज ठाकरे

(Dongri koli women meet Raj Thackeray)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.