AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eknath Shinde: शिवसेनेला हादरा देणारे पाच नेते, भुजबळ, ठाकरे ते शिंदे… पाहा कुणाकुणाकडून सेनेला दे धक्का

या आधाही काही दिग्गज नेते हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बाहेर पडले आहेत. त्यातली पाच नावं तर सध्या राज्याच्या राजकारणाच्या क्षितीजावर सतत गाजत असतात. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ अशा नेत्यांचा समावेश आहे. 

Eknath Shinde: शिवसेनेला हादरा देणारे पाच नेते, भुजबळ, ठाकरे ते  शिंदे... पाहा कुणाकुणाकडून सेनेला दे धक्का
शिवसेनेला हादरा देणारे पाच नेतेImage Credit source: tv9
| Updated on: Jun 21, 2022 | 3:11 PM
Share

मुंबई : आजची पाहट ही राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ माजवणारी ठरली आहे. कारण शिवसेनेच सर्वात जुने आणि भरोशाच्या सहकारी असणारे एकनाथ शिंदे हेच अचानक नॉट रिचेबल झाले. मात्र ते रिचेबल झाले तेव्हा ते सुरतमध्ये असल्याचे कळाले. त्यांच्यासोबत सेनेचे अनेक आमदार असल्याचीही माहिती समोर आली. त्यानंतर सेनेत पुन्हा एकदा मोठी फूट पडत असल्याचे चित्र निर्माण झालं. शिवसेनेत अशी अचानक फूट पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. या आधाही काही दिग्गज नेते हे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत बाहेर पडले आहेत. त्यातली पाच नावं तर सध्या राज्याच्या राजकारणाच्या क्षितीजावर सतत गाजत असतात. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मंत्री छगन भुजबळ अशा नेत्यांचा समावेश आहे.

  1. छगन भुजबळसर्वात आधी शिवसेनेतून दिग्गज नेते छगन भुजबळ हे बाहेर पडले. 1991 साली भुजबळांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि थेट राष्ट्रवादीत प्रवेश केला. पक्षनेत्याचं पद आणि मनोहर जोशींसोबतच्या मतभेदामुळे भुजबळांनी सेना सोडल्याचे बोलले जाते. यावेली सेनेला पहिल्यांदा मोठं खिंडार पडलं. त्यावेळी नऊ आमदारांना घेऊन भुजबळांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
  2. गणेश नाईकशिवसेनाला दुसरा मोठा झटका बसला तो गणेश नाईक यांच्या शिवसेना सोडण्याने, 1995 ला गणेश नाईक निवडून आल्यानंतर त्यांना महत्वाच्या मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र त्यांना डावलून पर्यवरण मंत्रिपद देण्यात आलं. मग शेवटी नाराज असणाऱ्या गणेश नाईकांनी 1999 ला शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आणि राष्ट्रवादीत प्रवेश केला. 
  3. नारायण राणेशिवसेनेला तिसरा सर्वात मोठा झटका बसला तो नारायण राणे यांच्या शिवसेना सोडण्याने, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाला असलेला राणेंचा विरोध आणि शिवसेनेतली गटबाजी बळावत गेल्याने राणेंनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला. 2005 साली राणेंनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर गेल्या विधानसभेवेळी भाजपात प्रवेश केला.
  4.   राज ठाकरे2006 साली शिवसेनेत पुन्हा एकदा उभी फूट पडली. ही फूट फक्त शिवसेनेतीलच नव्हती तर ती ठाकरे घराण्यातलीही फूट होती. कारण ज्या राज ठाकरेंना बाळासाहेब ठाकरेंचे राजकीय वारसदार म्हणून पाहिलं जायचं. तेच राज ठाकरे मतभेदांमुळे शिवसेनेतून बाहेर पडले आणि ठाकरे कुटुंबाच्या एकिलाही तडा गेल्याचे पहिल्यांदा महाराष्ट्राने पाहिलं.
  5. एकनाथ शिंदेआज एकनाथ शिंदे यांच्या बंडाने पुन्हा शिवसेनेला एक मोठा झटका बसलाय. विधान परीषदेच्या निकलानंतर एकनाथ शिंदे नॉट रीचेबल झाले होते. आणि ते सुरत येथील ली मेरेडियन या ठिकाणी 30 एक आमदारसह असल्याची माहिती समोर येत आहे. पुन्हा एकदा एका बड्या नेत्याने असे पाऊलं उचलल्याने शिवसेना पुन्हा एकाद मोठं खिंडर पडण्याच्या उंबरठ्यावर आहे. तर सरकारही सध्या धोक्यात आहे.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.