AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे परत येतील, उद्धव ठाकरे यांना विश्वास, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहे, एकत्र राहा, मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आवाहन

शिवसैनिकांनो एकत्र राहा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. संध्याकाळी उशिरा शिंदे यांच्या बंडाबाबत उद्भवलेल्या परिस्थितीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशी मुख्यमंत्री यांनी चर्चा केली.

Uddhav Thackeray: एकनाथ शिंदे परत येतील, उद्धव ठाकरे यांना विश्वास, काँग्रेस-राष्ट्रवादी सोबत आहे, एकत्र राहा, मुख्यमंत्र्यांचे शिवसैनिकांना आवाहन
आता उरलेल्या शिवसेना आमदारांना पुन्हा फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवणारImage Credit source: social media
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Jun 21, 2022 | 9:32 PM
Share

मुंबई – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)पुन्हा परत येतील, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी व्यक्त केला आहे. एकनाथ शिंदे माझे ऐकतील, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. आपले एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी (Congress-NCP) शिवसेनेसोबत आहे, शिवसैनिकांनो एकत्र राहा, असेही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. संध्याकाळी उशिरा शिंदे यांच्या बंडाबाबत उद्भवलेल्या परिस्थितीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांशी मुख्यमंत्री यांनी चर्चा केली. या बैठकीनंतर काँग्रेसच्या नेत्यांनीही महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, सरकारला धोका नसल्याची माहिती दिली आहे. उद्या दुपारी एक वाजता कॅबिनेटची बैठकही होणार आहे.

शरद पवार मुंबईत दाखल

एकनाथ शिंदे यांच्या बंडामंतर दिल्लीत असलेले शरद पवार संध्याकाळी मुंबईत परतले आहेत. त्यानंतर त्यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत बैठक होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान सकाळी याबाबत बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपद हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचे सांगत, या प्रकरणी शिवसेना निर्णय घेईल असे सांगितले आहे. आता मुंबईत परतल्यानंतर पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा होण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसच्या नेत्यांची महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उद्धव यांच्या बैठकीनंतर स्वतंत्र बैठक पार पडल्याची माहिती आहे.

शिवसेनेच्या बैठकीत २७ आमदार असल्याचा आमदाराचा दावा

दरम्यान शिवसेनेच्या बैठकीत २७ आमदार उपस्थित होते असा दावा शिवसेनेचे आमदार संजय बांगर यांनी केला आहे. त्यामुळे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ३५ नव्हे तर २८च आमदार आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. शिवसेनेच्या यामिनी जाधव, सहयोगी आमदार गीता जैन याही आमदार सूरतला असल्याची माहिती आहे. दरम्यान एकनाथ शिंदे हे बंडखोर शिवसेना आमदार नितीन देशमुख यांना भेटण्यासाठी रुग्णालयात गेलरे असल्याचीही माहिती आहे. त्यांना छातीत कळ आल्यानंतर, त्यांना सूरतच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असल्याची माहिती आहे. देशमुख यांच्या पत्नीही सूरतसाठी रवाना झाले असल्याची माहिती आहे. देशमुख यांच्यावर उपचार झाल्यानंतर, त्यांना पुन्हा हॉटेलमध्ये नेणार असल्याचे सांगण्यात येते आहे.

तुम्ही तुमचे ठरवा, मी माझे ठरवतो

दरम्यान सूरतमध्ये एकनाथ शिंदेंना भेटण्यासाठी मिलिंद नार्वेकर आणि रवींद्र फाटक हे गेले होते. त्यावेळी त्यांच्यात एक तास चर्चा झाली. त्यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांची फोनवरुन चर्चा झाली. त्यावेळी विधीमंडळ गटनेतेपदावरुन आपली उचलबांगडी केली, असा सवाल शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना केल्याची माहिती आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपाशी युती करुन सरकार स्थापन करावे आणि मविआ सरकारमधून बाहेर काढावी, अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. पक्षाविरोधात कोणतीही भूमिका घेतली नसताना विधीमंडळ गटनेतेपदारुन उचलबांगडी केल्याने एकनाथ शिंदे नाराज आहेत. अशा स्थितीत तुम्ही तुमचे ठरवा, मी माझे ठरवतो, असे एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना सांगितल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंसोबत अमित शाहांची बैठक होण्याची शक्यता

दरम्यान एकनाथ शिंदे यांची अमित शाहा, जे पी नड्डा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक होणार असल्याची माहिती आहे. या बैठकीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही लक्ष असेल, अशी माहिती आहे. या बैठकीत सत्ताबदलाचीयोजना निश्चित केली जाण्याची शक्यता आहे. भाजपाचे १०६ आमदार पुढील काही दिवस गोवा किंवा गुजरातला हलवले जातील अशीही माहिती समोर येते आहे.

Follow Us
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात...
ठो ठो आवाज आला... एकदा नव्हे दोनदा... नागपूरमधल्या गजबजलेल्या भागात....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी....
मुंबईत मराठी फलक नाही? मग कारवाई अटळ; हजारो आस्थापनांची तपासणी.....
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?
राष्ट्रवादीत मोठी धुसफूस! पार्थ पवार vs तटकरे- पटेल?.
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव
ही वादळापूर्वीची शांतता….डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याने जगभरात तणाव.
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.