‘त्या’ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा, निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

त्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा बडगा, निवडणूक आयोग अ‍ॅक्शन मोडवर
election commission of india
Image Credit source: TV9MARATHI
| Edited By: | Updated on: Apr 04, 2024 | 9:53 PM

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी जे नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येत असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली आहे. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी 50 हजार अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवडणूक विषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील 5 प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत.

या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य असून यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.