AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तुरूंगात पण कमी झाला नाही थाट; लॉरेन्स बिश्नोईच्या कपडे-बुटावर खर्च इतके लाख, आकडा वाचून व्हाल हैराण

Lawrence Bishnoi Jail Expenditure : लॉरेन्स बिश्नोई तुरुंगात पण थाटात राहत असल्याचा दावा त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. तो पुढे जाऊन गुन्हेगार होईल असे कधी वाटले नव्हते, अशी प्रतिक्रिया त्याच्या चुलत भावाने दिली आहे. लॉरेन्स नेहमी महागडे कपडे आणि बुट वापरतो, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

तुरूंगात पण कमी झाला नाही थाट; लॉरेन्स बिश्नोईच्या कपडे-बुटावर खर्च इतके लाख, आकडा वाचून व्हाल हैराण
लॉरेन्सचा तुरुंगात थाट
| Updated on: Oct 20, 2024 | 11:59 AM
Share

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर पुन्हा एकदा देशात लॉरेन्स बिश्नोई याचे नाव चर्चेत आले आहे. लॉरेन्स बिश्नोई हा पुढे जाऊन गुन्हेगार होईल असे वाटले नव्हते. लॉरेन्स नेहमी महागडे कपडे आणि बुट वापरतो, त्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत असल्याचा दावा त्याच्या एका चुलत भावाने केला आहे. द डेली गार्डियनच्या एका वृत्तानुसार, त्याचे कपडे आणि बुटासाठी कुटुंबाला 35 ते 40 लाख रुपये खर्च येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. लॉरेन्स बिश्नोईचे चुलत भाऊ 50 वर्षीय रमेश बिश्नोई यांनी याविषयीचा खुलासा केला आहे.

कुटुंबाकडे 100 एकरपेक्षा अधिक जमीन

“आम्ही सुरुवातीपासूनच श्रीमंत होतो. लॉरेन्सचे वडील हे हरयाणा पोलीस दलात शिपाई होते. गावाकडे त्यांची 110 एकर जमीन आहे. लॉरेन्स नेहमी महागडे कपडे आणि शूजचा वापर करतो. आता ही त्याचे कुटुंब त्याच्यावर वार्षिक 35-40 लाख रुपये खर्च येतो.” अशी माहिती रमेश बिश्नोई यांनी दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लाँरेन्स गँगने घेतली आहे. सलमान खान याच्याशी जवळीकतेमुळेच ही हत्याचा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. पोलीस या हत्येमागे लॉरेन्स बिश्नोई गँगचा हात असल्याबाबत तपास करत आहे.

कॅनडा पोलिसांचा आरोप काय?

याशिवाय कॅनडा पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोई गँगवर गंभीर आरोप केला आहे. बिश्नोई गँग भारतीय सरकारी एजंटाच्या मदतीने त्यांच्या देशात हिंसक कारवाया करत असल्याचा आरोप त्यांनी केला. अर्थात भारत सरकारने या सर्व दाव्यांचे खंडन केले आहे. देशात बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. छापेमारी केली. त्यात दहा आरोपींना आतापर्यंत अटक करण्यात आली आहे. तर काही जण अजूनही रडारवर आहेत.

लॉरेन्स बिश्नोई 2014 मध्ये राजस्थान येथील सालासर बालाजी मंदिर यात्रेदरम्यान गोळीबारानंतर तुरूंगात आहे. सध्या तो अहमदाबाद येथील साबरमती मध्यवर्ती तुरूंगात कैद आहे. गुजरात एटीएस आणि राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अनेक प्रकरणात त्याची चौकशी करत आहे.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी