AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो काळजी घ्या; 18 ते 69 वयोगटातील प्रत्येक तिसरा मुंबईकर उच्च रक्तदाबाचा रुग्ण; आहारात मीठाचे जास्त प्रमाण

मुंबईः सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात मुंबईकरांना आता जास्त काळजी करावी लागणार आहे. उच्च रक्तदाब, वाढता शुगरचा त्रास, हृदयविकाराचेही सध्या रुग्ण वाढत असतानाचा मुंबईमध्ये एका सर्वेक्षणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 18 ते 69 वयोगटातील (18 to 69 age group) प्रत्येक तिसऱ्या मुंबई करायला उच्च रक्तदाब (High blood pressure) असल्याची बाब एका पाहणी द्वारे पुढे आले […]

मुंबईकरांनो काळजी घ्या; 18 ते 69 वयोगटातील प्रत्येक तिसरा मुंबईकर उच्च रक्तदाबाचा रुग्ण; आहारात मीठाचे जास्त प्रमाण
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: Aug 01, 2022 | 8:28 AM
Share

मुंबईः सध्याच्या धक्काधक्कीच्या जीवनात मुंबईकरांना आता जास्त काळजी करावी लागणार आहे. उच्च रक्तदाब, वाढता शुगरचा त्रास, हृदयविकाराचेही सध्या रुग्ण वाढत असतानाचा मुंबईमध्ये एका सर्वेक्षणात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 18 ते 69 वयोगटातील (18 to 69 age group) प्रत्येक तिसऱ्या मुंबई करायला उच्च रक्तदाब (High blood pressure) असल्याची बाब एका पाहणी द्वारे पुढे आले आहे मुंबईकरांच्या (citizen of Mumbai) आहारात असलेले मीठ त्याला कारणीभूत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषानुसार प्रत्येकाच्या आहारात पाच ग्रॅमपेक्षा अधिक मीठ नसावे पण मुंबईकर दररोज 8.9 ग्रॅम मीठाचे सेवन करतात असा निष्कर्ष मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी काढला आहे.

या सर्वेक्षण अंतर्गत 5000 मुंबईकरांची पाहणी करण्यात आली. त्यामध्ये 34 टक्के मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचे आढळले आहे. हे सर्वजण प्रमाणापेक्षा अधिक मीठ आहाराद्वारे घेत असल्याचेही सांगण्यात आले.

अनेक जण दगावलेही

नोव्हेंबर 2021 ते जून 2022 या दरम्यान सर्वेक्षण करण्यात आले होते अशी माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली. उच्च रक्तदाबामुळे हृदय आणि मेंदू यांच्यावर परिणाम होऊन अनेक जण दगावल्याचेही आढळून आले असल्याचेही सांगण्यात आले.

घरोघरी जाऊन तपासणी

या पार्श्वभूमीवर मुंबई पालिकेने ही पाहणे हाती घेतली होती, घरोघरी जाऊन तपासणी करण्यात आली. यामध्ये झोपडपट्टी विभागातील काही नागरिकांचाही समावेश करण्यात आला होता, त्याचबरोबर महापालिकेच्या काही रुग्णालयांमधून अशा प्रकारची तपासणी करण्यात आल्याची माहिती पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

आहारामध्ये काय बदल

तपासणी केल्यानंतर उच्च रक्तदाब आढळलेल्या व्यक्तींना पालिकेच्या रुग्णालयांमध्ये उपचार देण्यात आले होते. त्यांच्या आहारामध्ये काय बदल करावेत किती प्रमाणात मीठ आहारात असावे याबद्दलही मार्गदर्शन करण्यात आले होते.

 12 हजार रुग्णांना आहार तज्ञांचा सल्ला

पुढील आठ ते नऊ महिन्यांमध्ये शहरातील 30 वर्षावरील नागरिकांची रक्तदाब तपासणी करण्यात येणार असून महापालिकेच्या रुग्णालयात केलेल्या एका वेगळ्या पाहणीमध्ये ज्यांना उच्च रक्तदाब आणि मधूनही आहे असे 12 हजार रुग्णांना आहार तज्ञांचा सल्ला उपलब्ध करून देण्यात आला असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

रक्ताभिसरण अधिक वेगाने झाल्यास

शरीरातील धमण्यामधून होणारे रक्ताभिसरण अधिक वेगाने झाल्यास ते उच्च रक्तदाबाचे लक्षण असू शकते अशी माहिती आरोग्य तज्ज्ञांनी दिली असून वाढता उच्च रक्तदाब हे शरीरासाठी घातक असल्याचेही आरोग्याधिकारी सांगितले.

140/90 या दाबापेक्षा अधिक असलेला रक्तदाब

140/90 या दाबापेक्षा अधिक असलेला रक्तदाबा उच्च रक्तदाब मानला जातो. यामध्ये अनेक मुंबईकर असल्यानेच त्यांना आहाराविषयी आणि आरोग्याविषयी काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले आहे.

34 टक्के अधिक मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास

मुंबईतील धक्काधक्कीच्या जीवनमानामुळे उच्च रक्कदाबाचा त्रास होत असून मुंबईतील झालेल्या सर्वेक्षणानुसार 34 टक्क्यांपेक्षा अधिक मुंबईकरांना उच्च रक्तदाबाचा त्रास असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Follow Us
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी...
साताऱ्यातून लष्कर-ए-तोयबा कनेक्शनचा संशय; मुंबई व्यावसायिकाला धमकी प्रकरणात एकाला अटक
भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
Bhopal | भोपाळहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचं आपत्कालीन लँडिंग, नेमकं काय घडलं?
मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! जरांगेंचं भाजपला आव्हान
Manoj Jarange Patil | मराठ्यांच्या मतांशिवाय निवडणूक जिंकून दाखवा! मनोज जरांगेंचं भाजपला थेट आव्हान; बावनकुळेंवरही केले गंभीर आरोप
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे..
अमित शाह यांची एशियाटिक सोसायटीला भेट, सांस्कृतिक वारसा जतन करण्याचे आश्वासन
संजय गायकवाड अडचणीत! महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी...
Sanjay Gaikwad | आमदार संजय गायकवाड अडचणीत! श्वेता महालेंवर आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बुलढाणा पोलिसांत गुन्हा दाखल
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी...
खाडकन उघडले धरणाचे 10 दरवाजे, पावसाचं कमबॅक होताच पाण्याची पातळी तुफान वाढली
मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा
Mumbai Rain Updates | मुंबईच्या दादरमध्ये पावसाची हजेरी! रिमझिम सरींनी मुंबईकरांना दिलासा