Bogus Seed: बोगस बियाण्यांच्या तक्रारींचा महापूर, दुबार पेरणीचे संकट, पुन्हा नागवला शेतकरी, सरकार आता तरी लक्ष घालणार की नाही?
Bogus Seeds Complaint: बोगस बियाण्यांमुळे विदर्भापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंतचा शेतकरी नागवला गेला. त्याची मोठी फसगत झाली. आर्थिक फसवणूक तर झालीच पण मेहनतही वाया गेली. त्याच्यावर दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे.

Bogus Seeds Complaint: बोगस बियाणांचा मुद्दा वारंवार उठवून सुद्धा सरकार मूग गिळून असल्याने शेतकऱ्यांच्या संतापाचा कडेलोट होत आहे. गेल्या आठवड्यात विधीमंडळात विरोधकांसह सत्ताधाऱ्यांनी हा विषय समोर आणला होता. सरकारने कारवाईची थातूरमातूर मलमपट्टी केली. ठोस कारवाईचे आश्वासन न दिल्याने बोगस कंपन्यांचे फावत आहे. कारवाईचा फार्स बंद करण्याची मागणी शेतकरी करत आहेत. बोगस आणि फसव्या बि-बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आर्थिक फसवणूक आणि मेहनत वाया गेली आहे. त्यांच्यावर दुबार पेरणीची वेळ आली आहे. सरकारने कारवाई न केल्यास अशा विक्रेत्यांविरोधात रुमणे बाहेर काढण्याचा इशारा शेतकरी संघटनांनी दिला आहे.
पश्चिम विदर्भात बोगस सोयाबीन बियाण्यांच्या तक्रारींचा महापूर
पश्चिम विदर्भात पेरणी करूनही सोयाबीन उगवल नसल्याच्या तब्बल 2382 शेतकऱ्यांनी तक्रारी कृषी विभागाकडे नोंदवल्या. सोयाबीन उगवलं नसल्याने दुसरीकडे शेतकरी राजा दुबार पेरणी करत आहे. विदर्भात प्रामुख्याने सोयाबीनची लागवड शेतकरी करतो, यावर्षी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची पेरणी केली. मात्र दहा ते अकरा दिवस उलटूनही सोयाबीन बियाणं निघालं नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे धाव घेत तक्रारी दाखल करायला सुरुवात केली आहे.
चौकशीनंतर कारवाई
पश्चिम विदर्भातील अमरावती ,यवतमाळ, वाशिम बुलढाणा, अकोला, या पाच जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी 2382 तक्रारी दाखल केल्या आहेत. उपविभागीय कृषी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्यात येत आहे. यामध्ये बऱ्यापैकी सर्वेक्षण पूर्ण झाले आहे,उगवण क्षमतेमध्ये अडचणी प्राथमिक दृष्ट्या दिसून आल्या. तात्काळ कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा कृषी अधिकारी यांना सूचना दिल्या. तसेच जे बियाणे निघाल्याने ते कृषी विभागाकडे आहेत ते विक्री बंद आदेश दिल्याची माहिती विभागीय कृषी सहसंचालक गणेश घोरपडे यांनी दिली.प्रयोग शाळेमध्ये नमुने पाठवले आहे या संदर्भात कंपन्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.
जिल्हानिहाय प्राप्त तक्रारी
1. अमरावती -488
2. अकोला 984
3. बुलढाणा. 562
4. यवतमाळ 319
5. वाशिम 29
एकूण तक्रारी 2382
बुलढाण्यात सोयाबीन बियाणे उगवले नसल्याच्या 400 हून अधिक तक्रारी
बुलढाणा जिल्ह्यात आतापर्यंत पेरणी 70 टक्क्यांवर झाली असून जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पेरलेले सोयाबीन बियाणे उगवले नसल्याने त्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तर कृषी विभागाकडे आतापर्यंत 400 शेतकऱ्यांनी बियाणे उगवले नसल्याची तक्रार केली असून यासंदर्भात पंचनामे सुरू आहेत. अगोदरच पाऊस उशिरा आला त्यामुळे जिल्ह्यातील पेरण्या रखडल्या आहेत, तर ज्यांनी पेरले त्यांचे बियाणे उगवले नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. आता बियाणे कुठून आणायचे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून ज्या कंपनीने सोयाबीनचे निकृष्ट बियाणे देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आलीय, शिवाय दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना तत्काळ बियाणे उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी सुद्धा करण्यात आलीय. याविषयी कृषी विभाग म्हणते की आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्याच्या अनुषंगाने पंचनामा सुरू आहे. अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल. त्यानंतर योग्य ती कारवाई करू अशी माहिती तालुका कृषी अधिकारी अशोक सुरडकर यांनी दिली.
गोलापांगरीतील शेतकरी संकटात
जालना जिल्ह्यात आतापर्यंत निम्म्या क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली मात्र अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये पेरलेलं बियाणं उगवलाच नसल्याचा प्रकार चालण्याच्या गोलापांगरी गावात उघडकीस आला,गोलापांगरी गावातल्या अनेक शेतकऱ्यांनी ग्रीन गोल्ड या कंपनीचं सोयाबीनच बियाणं विकत घेऊन पेरणी केली होतं.मात्र 15 दिवस उलटून गेले तरी हे बियाणं उगवलच नसल्याने आपली फसवणूक झाल्याचं या सगळ्या शेतकऱ्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे बोगास बियाणं शेतकऱ्यांच्या माथी देणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करा अन्यथा सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर येईल असा थेट इशारा गोलापांगरी गावातल्या काही शेतकऱ्यांनी दिला आहे, शिवाय पंचनामा करण्यासाठी कृषी विभागाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी आमच्या शेतात आला नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.
अंबाजोगाईतील शेतकरी हवालदिल
बऱ्याच खंडानंतर पाऊस पडला आहे आणि शेतकऱ्यांनी पेरणी केले आहेत या संदर्भात आमच्याकडे तक्रारी प्राप्त झाले आहेत या संदर्भात आमच्याकडे तक्रार निवारण समिती आमच्याकडे आहे आंबोली तालुक्यामध्ये 400 ते 500 तक्रारी आमच्याकडे दाखल झाले आहेत आणि या समितीने शेतकरीच्या शेतात जाऊन समितीने पाहणी केली आहे कंपनी प्रतिनिधी दुकानदार आणि आमच मंडळ याची तपासणी करून याचा अहवाल देणार आहेत आम्ही आमच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आव्हान करतो की ज्या शेतकऱ्यांच्या बियाणं उगवलं नाही त्यांनी आमच्याकडे तक्रार करावी यामध्ये कोणी दोषी असेल तर आम्ही त्यांच्यावर नक्की कारवाई करणार
आमचे शेतकरी बांधवांना आव्हान आहे की जोपर्यंत चांगला पाऊस पडत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये आतापर्यंत परळी तालुक्यात 68 टक्के पेरण्या झाल्या आहेत अजूनही पेरणीचा कालावधी संपलेला नाही दोन-तीन दिवसाचा 100 मीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असे आवाहन अंबाजोगाई तालुका कृषी अधिकारी विजय पवार यांनी केले आहे.