AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वांद्रे रेल्वेस्थानक सुशोभिकरणात फेरिवाल्यांची ‘लुडबूड’ सुरुच, भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली पाहणी

सुमारे 152 वर्षे जुन्या वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागाचे सुशोभिकरण काम सुरु असतानाच पुन्हा फेरिवाल्यांनी स्थानकाला वेढा घातला असून प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पालिका अधिऱ्यांसह पाहणी दौरा केला. याबाबत लवकरच पालिका, अधिकृत फेरिवाले, रिक्षा आणि रेल्वे याची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

वांद्रे रेल्वेस्थानक सुशोभिकरणात फेरिवाल्यांची 'लुडबूड' सुरुच, भाजप आमदार आशिष शेलार यांनी केली पाहणी
आशिष शेलार, भाजप नेते.
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 4:31 PM
Share

मुंबई : सुमारे 152 वर्षे जुन्या वांद्रे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेकडील भागाचे सुशोभिकरण काम सुरु असतानाच पुन्हा फेरिवाल्यांनी स्थानकाला वेढा घातलाय. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. भाजपा आमदार अॅड आशिष शेलार यांनी आज पालिकाअधिऱ्यांसह  या ठिकाणाचा पाहणी दौरा केला. याबाबत लवकरच पालिका, अधिकृत फेरिवाले, रिक्षा आणि रेल्वे याची संयुक्त बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले.

अनधिकृत फेरिवाल्यांवर मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात आली

वांद्रे स्थानकाच्या ऐतिहासिक रूपाला नवी झळाळी देण्यात आली आहे. वांद्रे स्थानक उपनगरीय मार्गावरील आकर्षक स्थानक असल्याने या स्थानकाला ‘उपनगरीय राणी’ असे संबोधले जाते. सुमारे 152 वर्षांपेक्षा जुन्या हेरिटेज ए-वन दर्जा असलेल्या वांद्रे स्थानकाला नवीन साज देण्यात येत असतानाच रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेकडील भागाचे सुशोभिकरण करण्यात यावे यासाठी स्थानिक आमदार म्हणून भाजपा नेते अॅड अशिष शेलार यांनी पाठपुरावा सुरु केला. रेल्वे, पालिका जागेच्या हद्दीचे वाद, फेरिवाल्यांनी घातलेला वेढा, त्यामुळे अपुरी जागा, त्याच ठिकाणी असलेला बस स्टॉप, रिक्षा स्टँड या सर्व विषयांवर मार्ग काढत या सुशोभिकरणाचा प्लॅन तयार करण्यात आला. त्यासाठी अनधिकृत फेरिवाल्यांवर मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात आली. ती लढाई न्यायालयापर्यंत गेली. त्यातून मार्ग काढून 2019 ला कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.

रिक्षा आणि बस यामुळे स्थानकातून बाहेर पडण्यास त्रास सुरु 

कोरोनाकाळात कामात शिथिलता येताच पुन्हा फेरिवाल्यांनी हळूहळू अतिक्रमण सुरु केले असून रिक्षा आणि बस यामुळे स्थानकातून बाहेर पडणे पुन्हा त्रासाचे झाले आहे. त्यातच रेल्वे आपल्या हद्दीत पादचारी पुलाचे काम करीत असून त्या कामातील भंगारचे गोडाऊन याच परिसरात बांधण्यात आले आहे. तर एकच मार्ग स्थानकात जाण्यास उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने आज आमदार आशिष शेलार यांनी महापालिका सहाय्यक आयुक्त मसूरकर यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. यावेळी स्थानिक नगरसेविका स्वप्ना म्हात्रे याही उपस्थितीत होत्या.

संयुक्त बैठक घेऊन  मार्ग काढण्यात येणार 

दरम्यान प्राप्त परिस्थिती पाहिल्यानंतर परवानाधारक फेरिवाले, रिक्षा युनियनचे प्रतिनिधी, बेस्टचे अधिकारी आणि रेल्वे, महापालिका अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन याबाबत मार्ग काढण्याचे आज निश्चित करण्यात आले. तसेच सुशोभिकरणासाठी मोकळ्या केलेल्या जागेत पुन्हा अतिक्रमण केलेल्या अनधिकृत फेरिवाल्यांवर कारवाई करण्याचे निश्चित करुन कामाला वेग देण्याच्या सूचना आमदार अॅड आशिष शेलार यांनी यावेळी केल्या.

इतर बातम्या :

अमृता फडणवीसांची नवाब मलिकांना कायदेशीर नोटीस, ‘जाहीरपणे माफी मागा, नाहीतर…’

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर शस्त्रक्रिया होणार?; डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबीयांशी बोलून घेणार निर्णय

Wrestler Nisha Dahiya Murder: कोच झाला फरार; पोलीसांकडून माहिती देणार्‍याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर

(feriwala creating trouble in bandra railway station premises bjp leader ashish shelar visited bandra station)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.