Raghuvanshi mills Fire | लोअर परेलच्या रघुवंशी मिलमधील आग पुन्हा भडकली

चेतन पाटील, Tv9 मराठी

|

Updated on: Jun 25, 2020 | 7:58 PM

लोअर परेलच्या रघुवंशी मिलमध्ये आज दुपारी भीषण आग लागली (Fire at Raghuvanshi Mill in Lower Parel). या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या.

Raghuvanshi mills Fire | लोअर परेलच्या रघुवंशी मिलमधील आग पुन्हा भडकली
Follow us

मुंबई :  लोअर परेलच्या रघुवंशी मिलमध्ये लागलेली आग पुन्हा भडकली आहे (Fire at Raghuvanshi Mill in Lower Parel).  अग्निशमन दलाच्या जवानांना दुपारपर्यंत या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं होतं. मात्र, संध्याकाळी आगीने पुन्हा जोर पकडला. अग्नीशमन दलाचे जवान आग विझवण्याचा शर्थीने प्रयत्न करत आहे. मात्र, आग वाढत चालली आहे. या आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. मात्र, इमारतीचं प्रचंड नुकसान झालं आहे (Fire at Raghuvanshi Mill in Lower Parel).

लोअर परेलच्या रघुवंशी मिलमध्ये आज दुपारी भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 4 गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. आग विझवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. रघुवंशी मिलमधील एका शोरुमला ही आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

रघुवंशी मिलमध्ये अनेक कॉर्पोरेट ऑफिस आहेत. याशिवाय अनेक वेगवेगळे दुकानं आणि शोरुम आहेत. रघुवंशी मिलमधील एका इमारतीत असणाऱ्या शोरुमला ही आग लागली. ही इमारत बाहेरुन काचेची आहे. त्यामुळे अग्निमशमन दलाचे जवान काच फोडून इमारतीत शिरले. याशिवाय आग इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागल्याची माहिती समोर आली. त्यामुळे शिडीच्या साहाय्याने जवान इमारतीत शिरले.

आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीने प्रयत्न सुरु आहेत. सध्या रघुवंशी मिलमध्ये अग्निशमन दलाच्या 14 ते 15 गाड्या दाखल झाल्या आहेत. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी दुपारी घटनास्थळी दाखल झाले होते. त्याचबरोबर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अरविंद सावंत हेदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.

ही आग इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागली आहे. ही इमारत गेल्या 4 महिन्यांपासून बंद होती. मुंबई महापालिकेनेच ही इमारत बंद केली होती. इमारतीत कुणीही कामास नव्हते. फक्त एक कामगार इमारतीत अडकला होता. त्याला सुखरुप बाहेर काढण्यात आलं आहे. आगीचे नेमके कारण कळू शकले नाही. अग्निशमन दलाचे जवान दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहोचले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

हेही वाचा : Gopichand Padalkar | पवारांवरील विधानानंतर गोपीचंद पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखल

Non Stop LIVE Update

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI