दादर पोलिस वसाहतीत आग, 14 वर्षीय मुलीचा मृत्यू

दादर पोलिस वसाहतीत आग, 14 वर्षीय मुलीचा मृत्यू


मुंबई : मुंबईतील दादर पश्चिमेकडील पोलिस वसाहतीला आग लागली आहे. सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यात एका 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे

दादर पश्चिमेला असलेल्या पोलिस वसाहतीतील एका इमारतीत दुपारी 1.45 च्या सुमारास आग लागली. तिसऱ्या मजल्यावरील एका घरातील सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचे सांगितलं जात आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरु आहे.

तिसऱ्या मजल्यावरील घरात लागलेल्या या आगीमुळे एक 14 वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे. श्रावणी चव्हाण असे मृत झालेल्या मुलीचे नाव आहे.