AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Narhari Zirwal: मोठी बातमी! नरहरी झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी पहिला गुन्हा दाखल, कुणावर थेट कारवाई? काय आहे तो मोठा आरोप?

Narhari Zirwal Viral Video Case: मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तृतीयपंथी पवन यादव हा मंत्र्यांसोबत दिसत आहे. या चित्रफितीने समाज माध्यमांवर एकच खळबळ उडवून दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी पहिली थेट कारवाई केल्याने इतरांचे धाबे दणाणले आहे. काय आहे तो मोठा आरोप?

Narhari Zirwal: मोठी बातमी! नरहरी झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओप्रकरणी पहिला गुन्हा दाखल, कुणावर थेट कारवाई? काय आहे तो मोठा आरोप?
नरहरी झिरवळImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 31, 2026 | 8:39 AM
Share

Narhari Zirwal Viral Video Case: मंत्री नरहरी झिरवळ हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहेत. त्यांच्या कार्यालयातील लिपिकाने लाच घेतल्याचे प्रकरणावर पडदा पडत नाही तोच एका कथित व्हायरल व्हिडिओने त्यांचे राजकीय करिअरच पणाला लागले. याप्रकरणी झिरवळ यांनी सर्व आरोप फेटाळले. तृतीयपंथी पवन यादव हा या व्हिडिओत मंत्र्यांसोबत दिसत आहे. या चित्रफितीने समाज माध्यमांवर विविध चर्चांना ऊत आला होता. प्रकरणात मुंबईतील कफ परेड पोलिसांनी पहिली थेट कारवाई केली आहे. हा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणात पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन यादवच्या भावाविरोधात गुन्हा दाखल

मंत्री झिरवळांच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रान्सजेंडरच्या तक्रारीनंतर त्याच्या भावाविरोधात कफ परेड पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल झाला आहे. व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणात हा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. व्हिडिओ व्हायरल करण्यापूर्वी तो एडिट केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्याआधारे पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

FDA मध्ये नोकरी लाव नाहीतर व्हिडिओ व्हायरल करतो

हा व्हिडिओ एडिट करून व्हायरल केल्याची तक्रार आहे. त्याआधारे पवन यादवच्या भावाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. FDA मध्ये नोकरी लाव नाहीतर व्हिडिओ व्हायरल करतो अशी धमकी पवनाला देण्यात आली होती. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्यात आल्याचा आरोप आहे. कफ परेड पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे. तर याप्रकरणी व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या इतर जणांवर सुद्धा गुन्हा दाखल होणार का? ही चर्चा रंगली आहे.

काय आहे त्या व्हिडिओत?

हा व्हिडिओ 7 महिन्यांपूर्वीचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण तो आताच बाहेर काढून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना चेकमेट करण्यात येत असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत आहे. महायुतीतील सत्तेचा सुकाणू आपल्या हाती राहावा यासाठी अशी प्रकरणं समोर आणली जात असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. या व्हिडिओत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री आणि दिंडोरी मतदारसंघाचे आमदार नरहरी झिरवळ दिसत आहेत. तृतीयपंथी पवन यादव हा त्यांच्या आजूबाजूला वावरताना दिसतो. त्याठिकाणी खाद्य पदार्थ आणि मद्याच्या बाटल्याही दिसतात.

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!