Smit Machchhar : जखमी होऊनही एकटा लढला, विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारा स्मिथ माछर मुंबईत राहतो तरी कुठे?
Smit Machchhar FlyDubai Incident: भारतीय पायलट कॅप्टन स्मित माछर यांनी आपला जीवाची परवा न करता शेकडो प्रवाशांना वाचवले. स्वत:वर चाकू हल्ला होत असतानाही त्यांनी आपले कर्तव्य अगदी चोखपणे बजावले, हे शौर्य दाखवणारे कॅप्टन मुंबईचे आहेत.

Smit Machchhar FlyDubai : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी दुबईस्थित भारतीय पायलट कॅप्टन स्मित माछरच्या असामान्य शौर्याची प्रशंसा केली. फ्लाय दुबईच्या FZ1073 विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन पायलटांमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान कॅप्टन माछर यांनी शौर्य दाखवून परिस्थिती हाताळली. त्याच्या शौर्याचे कौतुक सर्वच करत आहे. आपल्या जीवाची बाजी लावणारा स्मित माछर मुळ दुबईचा नसून मुंबईचा आहे. पण मुंबईत तो नेमका कुठे राहतो ते पाहा…
मुंबईतील घाटकोपरचे रहिवासी आणि गुडगावमध्ये प्रशिक्षित असलेल्या कॅप्टन स्मित माछरने १७० लोकांचे प्राण वाचवले. आता तो जगासाठी नायक बनले. कॅप्टन स्मित माछर मुंबईतील घाटकोपरचा रहिवासी आहेत. त्याने गुडगावमध्ये वैमानिक प्रशिक्षण घेतले. बुधवारी, तो त्यांच्या सह-वैमानिकासोबत दुबईहून तेल अवीवला विमान उडवत असताना, सह-वैमानिकाने त्याच्यावर चाकूने हल्ला केला. जखमी असूनही, त्याने विमानावरील कंट्रोल काही सोडला नाही. कॅप्टन स्मित माछरवर हल्ला झाला तेव्हा बोईंग ७३७ मॅक्स विमान कोसळण्याच्या अगदी जवळ होते. त्यावेळी, विमान अंदाजे ३०,००० फूट प्रति मिनिट या वेगाने खाली उतरू लागले. डेटानुसार, विमान केवळ २९ सेकंदात ३०,८७५ फुटांवरून १६,७५० फुटांपर्यंत खाली आले. या गंभीर क्षणी, कॅप्टन स्मित माछर यांनी सुमारे १४,००० फूट उंचीवर विमानाचा ताबा घेतला. अत्यंत बिकट परिस्थितीतही प्रसंगावधान दाखवून त्यांनी विमान कोसळण्यापासून वाचवले. या विमानात १७४ प्रवासी होते, त्यापैकी १६६ इस्रायली नागरिक होते.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी एका व्हिडिओ संदेशात ही घटना सांगितली आणि स्मित माछरला नायक म्हणून गौरवले. ते म्हणाले की, “विमानातील प्रवासादरम्यान, एका पायलटने दुसऱ्या पायलटवर चाकूने हल्ला केला. असे दिसते की, त्याने विमानातील सर्वांसह विमान कोसळवण्याचा प्रयत्न केला. या गंभीर क्षणी कॅप्टन स्मित माछर यांनी विमानाला कोसळण्यापासून वाचवले. त्यांनी विमानाचा ताबा घेताच, क्रू सदस्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि हल्ला करणाऱ्या सह-पायलटवर मात केली. या विमानात इतर दोन पायलट प्रवासी म्हणून प्रवास करत होते. कॉकपिटमधील परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर, दोन्ही पायलटांनी विमानाचा ताबा घेतला आणि सौदी अरेबियातील तबूक येथे ते सुरक्षितपणे उतरवले. त्यांच्यावर उपचार सुरु असून ते त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती समोर आली आहे.
मछारने १० वर्षांहून अधिक काळ मुंबईतून ‘स्पाइसजेट’साठी बोईंग विमानं चालवली आहेत; या काळात त्याने वरिष्ठ कमांडर आणि नंतर प्रशिक्षण देणारे कॅप्टन (ट्रेनिंग कॅप्टन) म्हणून पदोन्नती मिळवली. यानंतर तो २०२२ मध्ये दुबईला गेले.
