AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Flying Kiss Case: 9 वर्षांपूर्वी मुलीला ‘फ्लाईंग किस’, कोर्टाने ठोठावली 3 वर्षांची शिक्षा, सडक सख्याहरीला मोठा धडा

Mumbai Flying Kiss Case Verdict: 16 वर्षांच्या मुलीला 9 वर्षांपूर्वी पाठलाग करत फ्लाईंग किस देणार्‍या सडक सख्याहारीला मुंबई न्यायालयाने मोठा दणका दिला. न्यायालयाने त्याला प्रकरणात दोषी ठरवले आहे. हा लैंगिक छळ असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले आहे. कोर्टाने शिक्षेसह आरोपीला दंडही ठोठावला आहे. काय आहे हे प्रकरण?

Flying Kiss Case: 9 वर्षांपूर्वी मुलीला 'फ्लाईंग किस', कोर्टाने ठोठावली 3 वर्षांची शिक्षा, सडक सख्याहरीला मोठा धडा
मुंबई फ्लाईंग किसImage Credit source: गुगल
| Updated on: Feb 21, 2026 | 12:57 PM
Share

Mumbai Flying Kiss Case Verdict: मुंबई न्यायालयाने एका 9 वर्षे जुन्या छेडछाडीच्या प्रकरणात आरोपीला 3 वर्षांची शिक्षा सुनावली. आरोपीने एका हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात 16 वर्षांच्या मुलीला फ्लाईंग किस दिला होता. त्याची ही कृती त्याला चांगलीच महागात पडली आहे. पीडितेच्या म्हणण्यांनुसार, आरोपीने त्या दिवशी तिचा पाठलाग केला. इतकेच नाही तर त्याने तिचा हात धरला आणि तिला मागे ओढले. समज देऊनही त्याने तिला फ्लाईंग किस दिला. कुटुंबाच्या तक्रारीनंतर हे प्रकरण न्यायालयात पोहचले. दीर्घकाळ हा खटला सुरू होता. आता विशेष न्यायालयाने आरोपीला दोषी ठरवले. आरोपीला 3 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली.

9 वर्षांनी आरोपीला शिक्षा

हे प्रकरण मुंबईतील आहे. एका छोटेखानी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमाला या घटनेने गालबोट लागले होते. 2017 मध्ये हा कार्यक्रम सुरू असताना 16 वर्षीय पीडितेला तिच्याच शेजारील आरोपीने त्रास दिला. तिचा हात ओढला. तिला फ्लाईंग किस दिला. त्यावेळी आरोपी हा 19 वर्षांचा होता. मुलीने आरोपीला समज दिली. पण तो बधला नाही. तेव्हा मुलीने भीतभीतच ही माहिती कुटुंबाला सांगितली. या घटनेने दोन्ही कुटुंबांना मोठा धक्का बसला. तरुणाविरोधात तक्रार देण्यात आली. प्रकरण कोर्टात पोहचले.

आरोपी सतत देत होता त्रास

फ्लाईंग किस देण्यापूर्वी सुद्धा या मुलाने पीडितेला अनेकदा त्रास दिला होता. जेव्हा ती शिकवणीला जायची, तो पाठलाग करायचा. तो तिचा हात धरायचा आणि त्याच्याकडे ओढण्याचा, तिला बिलगण्याचा प्रयत्न करायचा. या घटनाक्रमाने मुलगी अगोदरच भीतीत होती. तर हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमात मुलाने पुन्हा तसेच कृत्य केले आणि तिला फ्लाईंग किस केला. या घटनेने तिला मोठा धक्का बसला. तिने कुटुंबाला ही माहिती दिली. मुलीच्या वडिलांनी मुलाला आणि त्याच्या आईला बोलवले. ही घटना सांगितली. तेव्हा मुलाच्या आई-वडिलांनी मुलीसह तिच्या कुटुंबाला शिवीगाळ केली. त्यानंतर मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

हा तर लैंगिक छळ

आरोपीच्या वकिलांनी न्यायालयात दावा केला की आरोप नाचत असताना त्याने फ्लाईंग किसचा इशारा केला. त्याचे तिला छळण्याचा अथवा इतर हेतू नव्हता. तर पीडितेच्या वकिलांनी हा दावा खोडून काढत आरोपी कसा त्रास देत होता, याचा युक्तीवाद केला. त्यानंतर न्यायालयाने फ्लाईंग किस देणे हा तर लैंगिक छळ असल्याचे मते नोंदवत आरोपीला तीन वर्षांची शिक्षा ठोठावली. आरोपीला प्रकरणात 3,000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...