AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या रिंगणात, पक्ष आणि मतदारसंघही ठरला, प्रचारालाही झाली सुरुवात

संजय पांडे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दलही घोषणा केली आहे.

माजी पोलीस आयुक्त संजय पांडे विधानसभेच्या रिंगणात, पक्ष आणि मतदारसंघही ठरला, प्रचारालाही झाली सुरुवात
| Updated on: Aug 19, 2024 | 8:59 AM
Share

Sanjay Pandey Contest Vidhansabha Election : आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहे. त्यातच आता विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले अनेक उमेदवार पुढे येत आहेत. अशातच मुंबई माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभेच्या रिंगणात उतरण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे संजय पांडे यांनी प्रचाराला सुरुवात केली असून त्यांनी कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दलही घोषणा केली आहे.

संजय पांडे यांची फेसबुक पोस्ट

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे सांगितले. “आज वर्सोवा येथे झुलेलाल मंदिरातून वर्सोवा विधानसभा मतदारसंघासाठी प्रचारची सुरुवात केली आहे. कुठलाही पक्ष नाही, पण आम्ही प्रयत्न करू…”, अशी पोस्ट संजय पांडे यांनी केली होती. संजय पांडे यांच्या पोस्टनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. यानंतर अनेक जण संजय पांडे कोणत्या पक्षातून आणि कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबद्दल तर्क-वितर्क लढवत होते.

त्यातच आता संजय पांडे यांनी नाशिकमध्ये मोठी घोषणा केली आहे. संजय पांडे हे राष्ट्रीय जनहित पक्षाच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. यावेळी त्यांनी स्वत: नाशिकमध्ये चार उमेदवारांची घोषणाही केली. तसेच त्यांनी मी स्वत: मुंबईतून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले. “विधानसभा निवडणुकीसाठी माझी समविचारी पक्षांबरोबर जाण्याबाबत चर्चा सुरु आहे. याबद्दलचा निर्णय लवकरच घेतला जाईल. तसेच महाराष्ट्रातील उर्वरित जागांवर उमेदवारी देण्याबद्दलही चाचणी सुरु आहे. त्याबद्दल लवकरच घोषणा करु”, असेही संजय पांडे म्हणाले.

बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणात झालेली अटक

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे बेकायदेशीर फोन टॅपिंग प्रकरणामुळे चर्चेत आले होते. संजय पांडे यांच्या कंपनीनं जवळपास 8 वर्षे नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या (NSE) कर्मचार्‍यांचे फोन बेकायदेशीरपणे टॅप केल्याची धक्कादायक माहिती समोर आली होती. संजय पांडे यांच्या iSEC सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं रेड सर्व्हर नावाच्या उपकरणांचा वापर करुन या कर्मचाऱ्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप सीबीआय आणि ईडीनं केला होता.

याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडेंना अटक करण्यात आली होती. 2010 आणि 2015 च्या दरम्यान Isec Services Pvt Ltd नावाच्या फर्मला NSE सर्व्हर आणि सिस्टम्सचे IT ऑडिट कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं होतं. सीबीआय आणि ईडीनं त्यांच्या फर्मची चौकशी सुरू केली होती. या चौकशीनंतर संजय पांडेंना अटक करण्यात आली. त्यानंतर डिसेंबर 2022 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाकडून त्यांना जामीन मंजूर करण्यात आला.

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.