AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तब्बल आठ तास बाळाच्या मेंदूवर शस्त्रक्रिया, वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांमुळे चार महिन्याच्या बाळाला नवजीवन

वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे एका चार महिन्याच्या बाळाला नवजीवन मिळालं आहे.

तब्बल आठ तास बाळाच्या मेंदूवर शस्त्रक्रिया, वाडिया रुग्णालयाच्या डॉक्टरांमुळे चार महिन्याच्या बाळाला नवजीवन
| Edited By: | Updated on: Aug 05, 2021 | 10:37 PM
Share

मुंबई : जन्मजात एन्सेफॅलोसेल डिसऑर्डर सारख्या दुर्मिळ आजाराने ग्रस्त असलेल्या अवघ्या चार महिन्याच्या कार्तिकला बाई जेरबाई वाडिया रूग्णालयातील डॉक्टरांच्या चमूने तब्बल आठ 8 तासांची अवघड मेंदूची यशस्वी शस्त्रक्रिया करुन नव्याने आयुष्य प्रदान केले आहे. मातेच्या गर्भाशयातच बाळाचा मेंदू कवटीमधून नाकापर्यंत खाली येऊन डोळे आणि नाकाला झाकून वाढत होता. त्यावर त्वरीत शस्त्रक्रिया आवश्यक होती.

नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्रातील नंदुरबारमधील धनाजी पुत्रो गावातील शेतकरी सुरेश कुटा पावरा आणि भारतीबाई सुरेश पावरा यांच्या बाळाला जन्मजात एन्सेफॅलोसेल डिसऑर्डरचे निदान झाले होते. बाळाच्या चेहऱ्यावर प्रचंड सूज, कपाळावर आलेली ही सूज (मेंदूचा काही भाग) जवळजवळ नाकापर्यंत आली होती. यामुळे बाळाला गिळणे, श्वास घेणे कठीण झाले आणि त्याची दृष्टी देखील कमकुवत झाली. तेथील डॉक्टर आणि परिचारिका यांनी कुटुंबाला दूसऱ्या रूग्णालयात उपचारासाठी त्वरीत नेण्यास सांगितले. त्यानंतर त्यांची तेथील रुग्णालयात सलग महिनाभर उपचार सुरू होते. पंरतू प्रकृतीत काही सुधार नव्हता.

गावातल्या प्राथमिक आरोग्य सेवा प्रदात्याने वाडिया रूग्णालयातील बालरोग न्यूरोसर्जनला काही फोटो पाठवले आणि त्यानंतर सहा दिवसांनी कुटुंबियांनी बाळाला मुंबईला नेण्याचे धाडसी पाऊल उचलले. कोरोना काळात असलेली संसर्गाची भिती आणि या काळात बाळाला घेऊन मुंबई गाठणे ही या कुटुंबियांकरिता आव्हात्मक बाब होती. कारण यापुर्वी त्यांनी मुंबई कधी पाहिलीच नव्हती. वाडिया रूग्णालयाच्या टीमने हे आव्हान पेलत त्याला यशस्वीरित्या सामोरे जाण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. बाळाचे प्राण वाचवण्यासाठी न्यूरोसर्जरी बरोबरच क्रॅनिओफेशियल प्लास्टिक सर्जरी टीम देखील तितकीच प्रयत्नशील होती.

डॉक्टरांनी शस्त्रक्रिया कशी केली?

“बाळाला फ्रंटोनॅसल एन्सेफॅलोसेलेचे निदान झाले आणि ते क्रॅनिओफेशियल विकृतीशी संबंधित होते. या दुर्मिळ अवस्थेमुळे बाळाचा मेंदू कवटीच्या मधून त्याच्या नाकापर्यंत खाली गेला. एन्सेफॅलोसेलेचे प्रमाण दहा हजारामध्ये एक बाळ असे जन्माला येऊ शकते. पाश्चात्य जगाच्या तुलनेत भारतात हे प्रमाण जास्त आहे. या आजाराला फॉलीक एसिडची कमतरता, अकाली प्रसुती आणि गर्भधारणेदरम्यानची गुंतागुत या गोष्टी कारणीभूत ठरतात”, असं वरिष्ठ न्युरोसर्जन डॉ. चंद्रशेखर देवपुजारी म्हणाले.

“मुलाचा मेंदू एखाद्या पिशवीसारखा खाली उतरला होता. त्याच्या मेंदू आणि डोळ्यातील हाड अपुरे पडले होते. त्याच्या मेंदूसह, त्याच्या मेंदूतील द्रवपदार्थाची जागा (वेंट्रिकल) आणि त्याच्या मेंदूची धमनी (आधीची सेरेब्रल धमनी) एन्सेफॅलोसेलेमध्ये होती. त्याच्या मेंदूच्या कार्यशैलीवर कोणताही परिणाम झाला नाही. पंरतू, बाळाला नाकातून श्वास घेणे अवघड जात असल्याने तो तोंडावाटे श्वास घेत होता. त्याची दृष्टी देखील कमजोर होती आणि त्याचं नाक आणि चेहरा पूर्णपणे विकृत झाला होता. केवळ ४ महिन्यांच्या वयात मेंदूतील द्रवपदार्थ जागा (वेंट्रिकल) आणि रक्तवाहिनी (आधीची सेरेब्रल धमनी) थैलीमध्ये असणे हे एक आव्हान होते. अशा प्रकारे कोविड प्रोटोकॉलचे पालन करून, बाळावर त्वरित आणि नियोजित पद्धतीने उपचार करण्यात आले”, असं डॉ. चंद्रशेखर देवपुजारी यांनी सांगितलं.

डॉ देवपुजारी पुढे म्हणाले, “22 जुलै 2021 रोजी क्रॅनिओटॉमी (विशिष्ट प्रकारची प्लाँस्टिक शस्त्रक्रिया) प्रक्रिया नियोजित करण्यात आली आणि त्याची कवटी उघडून त्याचा मेंदू मागे घेण्यात आला. काम न करणाऱ्या मेंदूच्या पिशवीतील सामान्य मेंदू त्याच्या चेहऱ्यावर लटकलेला होता. नंतर, मेंदू पुन्हा या पोकळीत पडू नये याची खात्री करत दोन डोळे आणि त्यावरील दुसरे हाड यांच्यामध्ये एक कृत्रिम हाड बसविण्यात आले.”

“आठ तास चाललेली शस्त्रक्रिया समाधानकारक होती. त्यानंतर बाळाला दोन दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले. नंतर सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. जर बाळाच्या उपचारात अजून विलंब झाला असता तर सूज आलेल्या भागातून मेंदूचा द्रव बाहेर पडला असता आणि मेंदूला संसर्ग झाला असता. पण वेळीच मुबंईला आणल्याने उपचार करणे शक्य झाले. लहान मुलांमध्ये, अतिरिक्त हाडे कवटीचे विरुपण होऊ शकतात. हाडांचा जबडा लावण्यासाठी हे बाळ चार वर्षाचे झाल्यानंतर मेंदूच्या भागात आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे”, अशी माहिती डॉक्टर देवपुजारी यांनी दिली.

बाळाच्या वडिलांनी डॉक्टरांचे आभार मानले

“आमच्या मुलाला वेदनेने रडताना पाहून आम्ही काय करावे हे सुचतच नव्हते. कारण बाळाचा मेंदू पेंडुलमसारखा लटकलेला होता. ही एक भयानक परिस्थिती होती. कारण लोक बाळाला पाहून घाबरु लागले होते. आम्हाला काय करावे आणि कोठे जावे हे माहित नव्हते. वाडिया रूग्णालयातील डॉक्टरांच्या आश्वासनानंतर आम्ही प्रथमच मुंबईत आलो. शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. परंतु, आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवला आणि आमच्या मुलाला त्यांच्या स्वाधीन केले. आज माझ्या बाळाला पुनर्जन्म मिळाला आहे. याबद्दल मी वाडिया रूग्णालयाचा कायम ऋणी असेल”, असं बाळाचे वडील म्हणाले.

“मी एक सामान्य शेतकरी असून कुटुंबातील एकमेव कमावणारा आहे. या काळात शस्त्रक्रियेसाठी निधी देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानतो. आम्हाला सांगितले आहे की, बाळाला डोक्यावरून आंघोळ करायची नाही. जोपर्यंत जखम पुर्णपणे बरी होत नाही तोपर्यंत त्याठिकाणी स्पर्श करायाचा नाही. तसेच या दुर्मिळ आजाराबाबत प्रामुख्याने जनजागृती करणे आवश्यक आहे. जर वेळीच याबाबत योग्य माहिती मिळाली तर योग्य उपचार मिळू शकतात”, असे बाळाचे वडील सुरेश पावरा म्हणाले.

न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी टीम, भूलविकारतज्ञ, नर्सिंग आणि आयपीसीयू टीम या साऱ्यांमुळे ही शस्त्रक्रिया प्रचंड यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेमुळे आता बाळ कार्तिक सामान्य आयुष्य जगू शकते. बाळाला नवीन आयुष्य मिळ्याल्याचा आम्हाला आनंद होत आहे. अशा गुंतागुंत असलेल्या रूग्णांवर सर्वोतोपरी यशस्वी उपचार करण्यासाठी आमच्याकडे कुशल कौशल्य असलेले डॉक्टर्स आणि अत्याधुनिक सुविधा असल्याचे वाडिया रूग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मिनी बोधनवाला यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा : आमदार निलेश लंकेंनी अरेरावी, शिवीगाळ, मारहाण केली नाही, ‘त्या’ लिपिकाचा खुलासा! नेमंक प्रकरण काय?

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.