स्कॉर्पिअन श्रेणीतील ‘वेला’ पाणबुडी भारतीय नौदलात दाखल

Namrata Patil

|

Updated on: Jul 05, 2019 | 3:48 PM

मुंबई : अत्याधुनिक यंत्रणा आणि फ्रेंच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार झालेली स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी अखेर समुद्रात झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे. आयएनएस ‘वेला’ असे या पाणबुडीचे नाव आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) या सरकारी कंपनीने ही पाणबुडी तयार केली आहे. आज सोमवारी (6 मे) ला ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे. काही वर्षांपूर्वी […]

स्कॉर्पिअन श्रेणीतील 'वेला' पाणबुडी भारतीय नौदलात दाखल

Follow us on

मुंबई : अत्याधुनिक यंत्रणा आणि फ्रेंच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार झालेली स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी अखेर समुद्रात झेपावण्यासाठी सज्ज झाली आहे. आयएनएस ‘वेला’ असे या पाणबुडीचे नाव आहे. मुंबईतील माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (एमडीएल) या सरकारी कंपनीने ही पाणबुडी तयार केली आहे. आज सोमवारी (6 मे) ला ही पाणबुडी नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली आहे.

काही वर्षांपूर्वी स्कॉर्पिन श्रेणीतील सहा पाणबुड्या तयार करण्यासाठी भारताने फ्रान्समधील मेसर्स नेवल ग्रुप (डीसीएनएस) या कंपनीशी करार केला होता. या करारानुसार स्कॉर्पियन पद्धतीची आयएनएस कलवरी ही पाणबुडी 14 डिसेंबर 2017 मध्ये नौदलाच्या ताफ्यात सुपूर्द करण्यात आली होती. त्यानंतर आयएनएस खादेंरी आणि आयएनएस करंज या दोन पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल झाल्या.

त्यानंतर आज सोमवारी स्कॉर्पिअन श्रेणीतील चौथी पाणबुडी भारतीय नौदलात दाखल झाली. सध्या या पाणबुडीच्या अनेक चाचण्या घेण्यात येणार आहे. या चाचण्यांमध्ये वेला पाणबुडीने योग्य ती क्षमता सिद्ध केल्यास तिचा नौदलात समावेश केला जाईल अशी माहिती नौदलातील अधिकाऱ्यांनी दिली.

भारतीय लष्कर हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे लष्कर मानले जाते. त्याचबरोबर भारताच्या नौदलाचाही जगभरात दबदबा आहे. भारतीय नौदलात सध्या तीन पाणबुड्या आहेत. त्यानंतर वेला या पाणबुडीच्या सर्व चाचण्या झाल्यानंतर तिचाही नौदलात समावेश होईल. यानंतर भारताकडे चार पाणबुड्या होतील. यामुळे भारताची समुद्रातील ताकद कित्येक पटीने वाढणार आहे.

त्याशिवाय भारतीय नौदलात स्कॉर्पिअन पद्धतीच्या आणखी दोन अशा दर्जाच्या पाणबुड्या तयार करण्याचे काम सुरू आहे. आयएनएस वागिर व आयएनएस वागशीर अशी या दोन पाणबुड्यांची नावं आहेत. या पाणबुड्यांचे काम लवकरच पूर्ण होणार असून त्यांनाही नौदलात समाविष्ट केलं जाणार आहे.

‘वेला’ पाणबुडीची वैशिष्ट्य : 

  • भारताच्या नौदलात याआधी 31 ऑगस्ट 1971 ला वेला नावाची पाणबुडी समाविष्ट करण्यात आली होती. त्या पाणबुडीने 37 वर्षे भारतातील सागरी सीमेची रक्षा केली. या पाणबुडीला 25 जून 2010 मध्ये सेवामुक्त करण्यात आले.
  • त्यानंतर अत्याधुनिक यंत्रणा आणि फ्रेंच तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तयार झालेली स्कॉर्पिअन श्रेणीतील वेला पाणबुडी तयार करण्यात आली.
  • स्कॉर्पियन श्रेणीतील पाणबुड्या स्टेल्थ टेकनिकनुसार समुद्राच्या खोलात कोणत्याही प्रकारचा आवाज न करता काम करु शकतात.
  • सध्या एमडीएलची आर्थिक उलाढाल 4 हजार 500 कोटी रुपयांपेक्षा अधिक झाली आहे.

Non Stop LIVE Update

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI