कोरोनामुळे पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा

कोरोनामुळे पालक गमावलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
Uday Samant

कोव्हिड-19 च्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा मृत्यू झाला असेल, अशा विद्यार्थ्यांचे पदवी, पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात आलं आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Jun 29, 2021 | 6:41 PM

मुंबई : कोव्हिड-19 च्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थी-विद्यार्थीनींच्या आई, वडील अथवा पालकांचा मृत्यू झाला असेल, अशा विद्यार्थ्यांचे पदवी तसेच पदव्युत्तर शिक्षण पूर्ण होईपर्यंतचे संपूर्ण शुल्क माफ करण्यात येत आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केली. (Full fee waiver for undergraduate / postgraduate students whose parents died due to corona; Announcement by Uday Samant)

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री सामंत म्हणाले, अनुदानित महाविद्यालय व विद्यापीठीय विभागातील सर्व अभ्यासक्रमांसाठी आकारण्यात येणाऱ्या इतर शुल्कांमधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगझिन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिव्हल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही. त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे.

प्रयोगशाळा व ग्रंथालय यांची देखभाल व ग्रंथालयामध्ये ई-कन्टेंट विकत घेण्यासाठी खर्च करण्यात आला असल्याने याबाबतच्या शुल्कामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल. विद्यार्थ्यांद्वारे वसतीगृहाचा उपयोग केला जात नसल्याने वसतीगृह शुल्कापोटी आकारण्यात येणारे शुल्क पुर्णपणे माफ करण्यात येईल.

विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित महाविद्यालयांद्वारे आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्क व विकास निधी यामध्ये सवलत देण्यात येणार नाही, परंतु इतर शुल्कामधील जिमखाना शुल्क, विविध गुणदर्शन/उपक्रम शुल्क, कॉलेज मॅगेजीन शुल्क, संगणक शुल्क, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी आणि युथ फेस्टिव्हल अशा ज्या बाबींवर कोणत्याही प्रकारे खर्च आकारण्यात आलेला नाही, त्या बाबींसाठी आकारण्यात येणारे शुल्क पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा व ग्रंथालय शुल्क यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येईल, असेही सामंत यांनी सांगितले.

इतर बातम्या

कोरोनाचा भयंकर वास्तव, 12 हजार लेकरांनी पालक गमावले, 401 लेकरांनी माय-बाप, सरकार काय करणार?

लसीकरण या एकाच मंत्राने तिसरी लाट थोपवता येईल, आरोग्यमंत्र्यांचं जनतेला आवाहन

एसएनडीटी महिला विद्यापीठाने पुढील 25 वर्षांचा विकास आराखडा तयार करावा; राज्यपालांच्या सूचना

(Full fee waiver for undergraduate / postgraduate students whose parents died due to corona; Announcement by Uday Samant)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें