शेतकऱ्यांना गोड बातमी… अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट

महाराष्ट्र सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. दिवाळीपूर्वी 5000 रुपये दुष्काळ मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. 73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले असून, उर्वरित रक्कम आज आणि उद्या जमा होईल. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

शेतकऱ्यांना गोड बातमी... अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट
devendra fadnavis
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 04, 2026 | 12:56 PM

विनायक डावरुंग, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी : दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. दुष्काळ निवारण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. दिवाळीपूर्वीच ही रक्कम दिली जाणार असल्याचंही सरकारने स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. तसे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

राज्यात भीषण दुष्काळ पडला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्राच्या मदतीची वाट न पाहता शेतकऱ्यांना अग्रिम रक्कम म्हणून 5 हजार रुपये देण्याची घोषणा केली होती. दिवाळीपूर्वीच ही रक्कम देणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. या रक्कमेचं वितरण करण्यास सुरुवातही झाली होती. उरलेले पैसे जमा करण्यासाठी आजच्या कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री आदेश देणार असल्याचंही सांगितलं जात होतं. पण त्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी ऊर्वरीत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे आदेश दिले आहेत.

Loading...

73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात

73 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात आतापर्यंत 5000 जमा झाले आहेत. उर्वरित खात्यात आज आणि उद्या बाकीची रक्कम जमा होणार आहे, असे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. उद्यापासून दिवाळी सुरू होत आहे. त्यापूर्वीच खात्यात पैसे येणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निमित्ताने शेतकऱ्यांची दिवाळी गोड जाणार आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांना शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करण्याचे आदेशही दिले आहेत.

305 तालुक्यात दुष्काळ

दरम्यान, राज्य सरकारने राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली होती. दरम्यान, शेतकऱ्यांचे सर्व पंचनामे करण्यात आले आहेत. त्यामुळे सरकारने केंद्राकडे 40 हजार कोटींचा प्रस्ताव पाठवला आहे. केंद्र सरकार राज्याला किती कोटींचं पॅकेज देते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. सिंधुदुर्गातून चारा खरेदी केला जाणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पाणी आहे. तिथे चाऱ्याची लागवड करावी, हा चारा विकत घेतला जाईल, असं सरकारने स्पष्ट केलं आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us